भारतीय क्रिकेट संघाला नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. 22 नोव्हेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी आतापासूनच या मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचा आनंद द्विगुणित होणार आहे. तो दुसऱ्यांदा बाप होणार आहे. त्याची पत्नी बेकी बोस्टनने सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी सांगितली आहे.
मंगळवारी (20 ऑगस्ट) कमिन्सच्या पत्नीने आपण दुसऱ्यांदा आई बनणार असल्याची बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली. आपल्या मुलासोबतचे 3 फोटो शेअर करत तिने ही गुड न्यूज दिली आहे. फोटोंसोबत बेकीने लिहिले की, ‘आम्हाला ही बातमी शेअर करताना खूप आनंदी आहोत! तुला भेटायला आणि आमच्या आयुष्यात थोडे वेडेपणा वाढवायला आम्ही खूप उत्सुक आहोत बाळा.’
पॅट कमिन्स आणि बेकी यांचा 2020 मध्ये साखरपुडा झाला होता. त्यानंतर दोघांनी ऑगस्ट 2022 मध्ये लग्न केले. दोघांना अल्बी नावाचा एक मुलगा आहे. अल्बीचा जन्म 8 ऑक्टोबर 2021 रोजी झाला होता.
View this post on Instagram
दरम्यान पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने 2023 च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा पराभव केला होता. आयपीएल 2024 मध्ये पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसला होता. कोलकाता नाईट रायडर्सने लीगच्या अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता. यानंतर आता या वर्षाच्या अखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 कसोटी सामने खेळवले जातील.
असे आहे वेळापत्रक
पहिली कसोटी: 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6 ते 10 डिसेंबर, ओव्हल
तिसरी कसोटी: 14 ते 18 डिसेंबर, गाबा
चौथी कसोटी: 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3 ते 7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘काला चष्मा’ गाण्यावर 2 ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या मनू भाकरचा भन्नाट डान्स
“असं वाटतं एकावेळी दोन सामने…” पाकिस्तानच्या स्टार गोलंदाजानं दिली भावनिक प्रतिक्रिया
दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीसोबत फोटो घेण्यासाठी खूप इच्छुक ‘ही’ महिला खेळाडू