---Advertisement---

यावरुन कळते गांगुली टीम इंडियासाठी किती कष्ट घेत आहे

On: शुक्रवार, मार्च 20, 2020 8:00 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपले कार्यालय बंद केले आहे. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्यास सांगितले आहे. यावेळी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीलादेखील बऱ्याच दिवसांनंतर सुट्टी मिळाली आहे.

गांगुलीने (Sourav Ganguly) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक सेल्फी घेतलेला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देत गांगुलीने लिहिले की, “कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे पाच वाजेपर्यंत लाउंजमध्ये बसण्याचा आनंद वेगळाच आहे. असा मोकळा वेळ यापुर्वी मला कधी मिळाला होता ते आठवत नाही.”

बीसीसीआयने (BCCI) कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता मंगळवारपासूनच (१७ मार्च) कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याचे आदेश दिले होते.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसला जागतिक साथीचा रोग घोषित केले. यानंतर बीसीसीआयच्या मुंबई मुख्यालयात गर्दी होऊ नये म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याचे आदेश देण्यात आले होते.

बीसीसीआयबरोबरच बंगाल क्रिकेट असोसिएशन (Bengal Cricket Association) आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (Maharashtra Cricket Association) कोरोना व्हायरसमुळे आपल्या कार्यालय १७ मार्च ते २१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-दक्षिण आफ्रिकेचा स्टार डेल स्टेन पाकिस्तानच्या हाॅटेलमध्ये होता अरेस्ट

-टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू कधीही वापरत नाही फोन

-आयपीएलसाठी तुम्ही एका महान व्यक्तीचा अपमान करताय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---