श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात पथुम निसांका याने इतिहास घडवला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 3 विकेट्सच्या नुकसानावर 381 धावा केल्या. यात एकट्या सलामीवीर निसांकाने 210* धावांचे योगदान दिले. या द्विशतकी खेळीच्या जोरावर निसांकाने खास विक्रम आपल्या नावावर केला.
पथूम निसांका श्रीलंकेसाठी वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा पहिला फलंदाज ठरला. याआधी श्रीलंकेसाठी सर्वात्तम वनडे खेळी सनथ जयसूर्या यांनी 189 धावांची केली होती. निसांकाने शुक्रवारी (9 फेब्रुवारी) अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 210 धावा केल्या. ही श्रीलंकेसाठी वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी ठरली. विशेष म्हणजे स्वतः जयसूर्या हा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होते. जयसूर्यांनी निसांच्या द्विशतकानंतर उभे राहून टाळ्या वाजवल्या. सलामीवीराची ही खेळी नक्कीच कौतुकास पात्र ठरत आहे.
Pathum Nissanka becomes the first player to score ODI double century for Sri Lanka.
Not just that – First ever Sri Lankan to score a List-A double century.#SLvAFG pic.twitter.com/hOgguTLzfH
— Kausthub Gudipati (@kaustats) February 9, 2024
Sanath Jayasuriya watched Pathum Nissanka breaking his record and becoming 1st Sri Lankan with a 200 in ODIs. ???? pic.twitter.com/o4iIZzfUYP
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 9, 2024
(Pathum Nissanka makes history with the first Sri Lankan double hundred in ODI cricket)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
अफगाणिस्तान – रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, नूर अहमद, फजलहक फारुकी, फरीद अहमद.
श्रीलंका – अविष्का फर्नांडो, पथुम निसांका, कुसल मेंडिस (कप्तान, विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, दुष्मंथा चमीरा, प्रमोद मदुशान, दिलशान मदुशंका.
महत्वाच्या बातम्या –
‘1000 वेळा म्हणेल’, राम मंदीराबाबत मोहम्मद शमीचे मोठे विधान, जिंकली सर्व राम भक्तांची मने
L&T मुंबई ओपन डब्लूटीए स्पर्धेच्या एकेरीत भारताच्या ऋतुजा भोसलेचे आव्हान संपुष्टात






