मागील काही काळापासून भारतीय संघातून बाहेर असणारा स्टार फलंदाज शिखर धवन याच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. धवनचा पत्नी आयेशा मुखर्जीसोबत घटस्फोट झाला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस परिसरातील कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. याव्यतिरिक्त कोर्टाने धवनला त्याच्या मुलाला भेटण्याचीही परवानगी दिली आहे. यामुळे क्रिकेटपटूसोबतच त्याच्या चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
धवनचा पत्नीसोबत घटस्फोट
कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश हरीश कुमार यांनी घटस्फोटाची याचिका स्वीकारली आहे. तसेच, शिखर धवन (Shikhar Dhawan) याने आयेशा मुखर्जी (Aesha Mukerji) हिच्यावर लावलेले सर्व आरोप स्वीकारले आहेत. हे आरोप या आधारावर स्वीकारले गेले आहेत की, एक तर पत्नीने या आरोपांचा विरोध केला नाही किंवा ती स्वत:चा बचाव करण्यात अयशस्वी ठरली. यावेळी न्यायाधीशांनी हेदेखील मान्य केले की, आयेशाने धवनला त्याच्या मुलापासून दूर राहण्यासाठी भाग पाडून त्याला मानसिक त्रास दिला.
Delhi Family Court has accepted all the allegations made by Shikhar Dhawan against his wife in his divorce petition. Dhawan's wife failed to defend herself. pic.twitter.com/VDPHQISSjt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 4, 2023
सध्या मुलगा झोरावर कुणापाशी राहील, यावर न्यायालयाने कोणताही आदेश दिला नाहीये. मात्र, त्यांनी हे मान्य केले की, धवन भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये एका योग्य काळासाठी मुलाशी भेटू शकतो आणि त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलूही शकतो. तसेच, न्यायालयाने आयेशाला शैक्षणिक वर्षादरम्यान शाळेच्या सुट्ट्यांच्या अर्ध्या काळात मुलाला धवन आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांसोबत रात्रभर राहण्यासह भेटण्याच्या उद्देशाने भारतात आणण्याचे आदेश दिले. न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्ता शिखर धवन हा एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.
सन 2012मध्ये झालं होतं लग्न
खरं तर, शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी (Shikhar Dhawan And Aesha Mukerji) यांचे लग्न 2012मध्ये झाले होते. आयेशा धवनपेक्षा 10 वर्षांनी मोठी असून हे तिचं दुसरं लग्न आहे. आयेशाचे पहिले लग्न ऑस्ट्रेलियाच्या व्यावसायिकाशी झाले होते. त्याच्याकडून तिला 2 मुली आहेत. धवन-आयेशाला झोरावर नावाचा एक मुलगा आहे. दोघांची भेट फेसबुकवर एका कॉमन मित्रामार्फत झाली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले.
भारतीय संघातून बाहेर
शिखर धवन दीर्घ काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. आता तो फक्त आयपीएल खेळतानाच दिसतो. तो भारतीय संघासाठी तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळला आहे. त्याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 34 कसोटीत 2315 धावा, 167 वनडेत 6793 धावा आणि 68 टी20 सामन्यात 1759 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 7, तर वनडेत 17 शतकांचाही समावेश आहे. (patiala house court grants divorce to indian cricketer shikhar dhawan on wife aesha mukerji)
हेही वाचा-
ताज्या आयसीसी क्रमवारीत सिराजचा तोटा, फलंदाजांमध्ये गिल दुसऱ्या क्रमांकावर कायम, पण…
वर्ल्डकप खेळण्यासाठी कारकीर्द पणाला लावणार साउदी? दुखापतीचीविषयी महत्वाची अपडेट