प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १४ तारखेला प्रो कबड्डीचा ११६ वा सामना पटणा पायरेट्स विरुद्ध तेलुगू टायटन्स यांच्यात झाला. गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या पटणा पायरेट्सने ३८-३० च्या फरकाने हा सामना जिंकला आहे. हा त्यांचा हंगामातील १४ वा विजय होता.
🚨FULL TIME🚨
League leaders Patna Pirates avoid a scare to clinch a victory against Telugu Titans.#PKL #PKL8 #Kabaddi #ProKabaddiLeague #VIVOProKabaddi pic.twitter.com/0VoZNAWD6e
— Khel Kabaddi (@KhelNowKabaddi) February 14, 2022
प्रो कबड्डी लीग २०२१ च्या गुणतालिकेवर नजर टाकायची झाल्यास, पटणा पायरेट्सचा संघ चौथ्या जेतेपदावर मोहोर मारण्याच्या नजीक आहे. त्यांनी आतापर्यंत १८ सामने खेळले असून त्यापैकी सर्वाधिक १३ सामने जिंकत ७० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर त्यांच्यापाठोपाठ दबंग दिल्ली संघ ६५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच हरियाणा स्टिलर्स (६३ गुण), बेंगलुरू बुल्स (६० गुण) आणि यूपी योद्धा (५८ गुण) टॉप-५ मध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आठ कोटी खर्च करूनही आर्चर असेल अनुपलब्ध, तरीही मुंबईने का लावला दाव? नीता अंबानी म्हणाल्या…
मेगा लिलावानंतर भारतीय दिग्गजाने ‘या’ तीन संघांना म्हटले सर्वात मजबूत