प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १० तारखेला प्रो कबड्डीचा १०७ वा सामना पटणा पायरेट्स विरुद्ध पुणेरी पलटण यांच्यात झाला. गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या पटणा पायरेट्सने ४३-२६ च्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला आहे.
Patna Pirates continue their good run of form in PKL 8.😍💥👇#PKL #pkl8 #ProKabaddiLeague #VIVOProKabaddi #Kabaddi pic.twitter.com/455Zq7tdJz
— Khel Kabaddi (@KhelNowKabaddi) February 10, 2022
तत्पूर्वी प्रो कबड्डीचा १०६ वा सामना बेंगाल वॉरियर्स विरुद्ध दबंग दिल्ली संघात झाला. उभय संघातील हा सामना अखेर ३९-३९ ने बरोबरीत सुटला.
प्रो कबड्डी लीग २०२१ च्या गुणतालिकेवर नजर टाकायची झाल्यास, पटणा पायरेट्सचा संघ चौथ्या जेतेपदावर मोहोर मारण्याच्या नजीक आहे. त्यांनी आतापर्यंत १७ सामने खेळले असून त्यापैकी सर्वाधिक १२ सामने जिंकत ६५ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर त्यांच्यापाठोपाठ हरियाणा स्टिलर्स संघ ५८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच दबंग दिल्ली (५७ गुण), बेंगलुरू बुल्स (५५ गुण) आणि पिंक पँथर्स (५१ गुण) टॉप-५ मध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“साहा, तू बेस्टच आहेस, पण संघातील राजकारणाला बळी पडलास”, माजी क्रिकेटरची आगपाखड
नारळ देण्यासाठी फक्त औपचारिकता बाकी! रहाणेसह ‘या’ ४ खेळाडूंना श्रीलंकेविरुद्ध खेळवणार नाही बीसीसीआय
भारताच्या ताफ्यात निवड होऊनही कुलदीप बाकावरच, संघ व्यवस्थापनाच्या वागणुकीवर प्रशिक्षक म्हणाले…