जगातील सर्वात मोठी कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आगामी हंगामासाठी पार पडतो आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्वांची नजर मागील तीन हंगामापासून सर्वात यशस्वी रेडर असलेल्या पवन सेहरावत याच्यावर होती. अपेक्षेप्रमाणेच त्याच्यावर सर्वाधिक रकमेची बोली लागली. तब्बल २ कोटी २६ लाख रुपयांच्या बोलीसह तो प्रो कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला.
He came. He flew. He blew @tamilthalaivas away – 2⃣x power!
The most expensive player in the #vivoPKLPlayerAuction yet is PAWAN SEHRAWAT – 𝟚.𝟚𝟞 𝕔𝕣𝕠𝕣𝕖𝕤!#PawanSehrawat
— ProKabaddi (@ProKabaddi) August 5, 2022
या लिलावात पवनची बेस प्राईज ३० लाख रुपये होती. मात्र, हरियाणा स्टीलर्सने त्याची बोली थेट १ कोटी रुपयांपासून सुरू केली. यु मुंबाने ही बोली पुढे वाढवत १ कोटी ५० लाखांपर्यंत नेली. त्यानंतर हरियाणाने पुढे बोली लावली नाही. मात्र, विकास कंडोलवेळी माघार घेतलेल्या तमिल थलाईवाजने बोली पुढे लावत मुंबईला टक्कर दिली. अवघ्या १० मिनिटांपूर्वी कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या विकास कंडोलाला त्याने सहज मागे टाकले.
यासोबतच काही वेळात तो प्रो कबड्डी इतिहासात २ कोटी रुपयांची बोली लागणारा पहिला खेळाडू ठरला. अखेरीस पवनला आपल्या संघात घेण्यासाठी जंग जंग पछाडलेल्या तमिल थलाईवाजने २ कोटी २६ लाख रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले.
पहिल्या दिवशीच्या लिलावात पवन व्यतिरिक्त इतर काही खेळाडूंनी देखील लक्ष वेधून घेतले. विकास खंडोला याला १ कोटी ७० लाखांची बोली लावत बंगलोर बुल्सने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. इराणचा कर्णधार फजल अत्राचली याला देखील १ कोटी ३८ लाख रुपये देत पुणेरी पलटणने पुणेकर बनवले. तसेच प्रो कबड्डी इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू परदीप नरवाल ९० लाखांसह युपी योद्धाजचा भाग बनला. इराणचा दुसरा अष्टपैलू नबीबक्ष याला पुणेरी पलटणने ८७ लाखांना खरेदी केले.
महत्त्वाच्या बातम्या-
ईशान नको, ऋतुराज नको अन् नको रिषभ! ‘या’ खेळाडूला द्या ओपनिंगला संधी
टी-ट्वेंटी विश्वचषकातील पराभवाचा बदला इंडिया घेणार, खुद्द पाकिस्तानचा खेळाडूच म्हणतोय…