---Advertisement---

MPL 2025: हे पांडव बदलणार एमपीएलमध्ये पीबीजी कोल्हापूर टस्कर्सचे नशिब

---Advertisement---

एमपीएल 2025 मध्ये पीबीजी कोल्हापूर टस्कर्स (PBG Kolhapur Tuskers) संघ मजबूत संघांपैकी एक मानला जातोय. पहिल्या हंगामात अंतिम सामन्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. तर दुसऱ्या वर्षी त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेले. आंतरराष्ट्रीय खेळाडू राहुल त्रिपाठी याच्या नेतृत्वात संघ दुसऱ्या वर्षी खेळणार आहे. पहिल्या दोन वर्षी विजेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतर तिसऱ्या वर्षी ते विजेतेपदासाठी पूर्ण ताकद लावतील. मात्र, त्यांना हे स्वप्न पूर्ण करायचे असल्यास या पाच खेळाडूंना फॉर्ममध्ये राहणे गरजेचे असेल.

राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi)- कर्णधार राहुल त्रिपाठी हा पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचा सर्वात मोठा आधारस्तंभ मानला जातो. आंतरराष्ट्रीय व आयपीएल क्रिकेटचा अपार अनुभव त्याच्या पाठीशी आहे. दुसऱ्या हंगामात कोल्हापूर संघाचा भाग झाल्यानंतर त्याने स्पर्धेत 209 च्या स्ट्राईक रेटने 383 धावा फटकावल्या होत्या. कोल्हापूरला आपली पहिली एमपीएल ट्रॉफी जिंकायची असल्यास, राहुल त्रिपाठी याला संपूर्ण हंगामात सातत्य राखावे लागेल.

अंकित बावणे (Ankeet Bawne)- मिस्टर आयपीएल म्हणून ओळख मिळवलेला अनुभवी अंकित बावणे कोल्हापूर टस्कर्सच्या फलंदाजी क्रमातील सर्वात विश्वसनीय फलंदाज आहे. अंकित याने सलग दोन हंगामात सर्वाधिक धावा बनवून ऑरेंज कॅप जिंकली होती. मागील एक दशकापेक्षा जास्त काळापासून तो महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा फलंदाज आहे. कोल्हापूर संघाच्या पहिल्या दोन हंगामातील सातत्यपूर्ण कामगिरीत अंकितचा सिंहाचा वाटा राहिला होता. दुसऱ्या हंगामात कोल्हापूर विजेता ठरल्यास त्यास अंकित मोठे कारण बनू शकतो.

श्रेयस चव्हाण (Shreyas Chavan)- लेगस्पिनर श्रेयस चव्हाण हासलग तिसऱ्या वर्षी कोल्हापूर टस्कर्स संघासाठी मैदानात उतरेल. श्रेयस हा एमपीएल इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. तो कोल्हापूर संघाच्या फिरकी गोलंदाजीचे नेतृत्व करेल. स्पर्धेच्या उत्तरार्धात खेळपट्टी फिरकीला फायदेशीर ठरल्यास श्रेयस अधिक घातक ठरू शकतो. त्यामुळे श्रेयसच्या फॉर्मवर कोल्हापूर संघाचा स्पर्धेतील प्रवास अवलंबून असणार आहे.

धनराज शिंदे (Dhanraj Shinde)- एमपीएल 2025 आधी पीबीजी कोल्हापूर टस्कर्सने ईगल नाशिक टायटन्सचा यष्टीरक्षक धनराज शिंदे याला ट्रेड करत आपल्या संघात सामील केलेले. धनराज याला पहिल्या दोन हंगामातील त्याच्या कामगिरीमुळे सिक्सर किंग असा किताब मिळाला आहे. त्याच्या नावे स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार आहेत. यष्टीरक्षक व फिनिशर अशा दोन भूमिका तो पार पाडतो. एकाच षटकात पाच षटकार मारण्याची कामगिरी त्याने केली होती. यावर्षी हीच कामगिरी कोल्हापूरसाठी तो करू शकला तर, कोल्हापूर टस्कर्स विजेतेपद मिळवण्याच्या जवळ जाऊ शकते.

रजनीश गुरबानी (Rajnish Gurbani)- विदर्भासाठी जवळपास दहा वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी मागील वर्षी महाराष्ट्र संघाचा भाग बनला. यावेळी एमपीएल लिलावात तो प्रथमच सहभागी होत होता. त्याच्या अनुभव व गोलंदाजीचा फायदा करून घेण्यासाठी सर्वच सगळ्यांनी त्याच्यावर बोली लावली. त्यामुळे त्याच्यावर तब्बल 5 लाख 20 हजार इतकी बोली लागली. रजनीश याने आपल्या प्रतिष्ठेनुसार गोलंदाजी केल्यास कोल्हापूर टस्कर्स संघासाठी आनंदाची गोष्ट असेल.

एमसीए अध्यक्ष आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, एमपीएल 2025 सोबतच डब्ल्यूएमपीएल (WMPL) ही महिलांची लीग देखील होईल. महिलांची लीग खेळवणारे एमसीए देशातील पहिले असोसिएशन आहे. या दोन्ही स्पर्धा पुण्याच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जातील. या दोन्ही स्पर्धांसाठी प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश दिला जाईल. JioHotstar OTT आणि Star Sports 2 टीव्ही चॅनलवर या स्पर्धा पाहता येतील. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 TV Channel)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---