---Advertisement---

MPL 2025 दुसऱ्या स्थानावर पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्सची नजर

On: बुधवार, जून 11, 2025 5:59 PM
---Advertisement---

एमपीएल 2025 मध्ये बुधवारी (11 जून) एकच सामना खेळला जाईल. या सामन्यात पुणेरी बाप्पा व कोल्हापूर टस्कर्स हे संघ आमने-सामने येतील. पुणेरी बाप्पा आपले द्वितीय स्थान राखण्याचा प्रयत्न करेल. तर, मोठ्या विजयासह कोल्हापूर याच दुसऱ्या स्थानावर हक्क सांगण्यासाठी सज्ज असेल.

पुणेरी बाप्पा संघासाठी आत्तापर्यंत हा हंगाम अपेक्षेप्रमाणे गेला आहे. पहिल्या दोन सामन्यात त्यांनी दणदणीत विजय मिळवले होते. ईगल नाशिक टायटन्सविरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यात त्यांना थोडक्यात पराभव पत्करावा लागला. असे असले तरी, संघाची एकूण कामगिरी जबरदस्त राहिली आहे. दुसऱ्या बाजूला कोल्हापूर टस्कर्सने आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवलेला. मात्र, त्यानंतर सलग दोन सामन्यात त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. अनुभवी फलंदाजांचे अपयश हा संघाच्या विजय मार्गातील सर्वात मोठा अडथळा मानला जातोय.

पुणेरी बाप्पा संघाची ताकद त्यांचे फलंदाज आहेत. यश नाहर, मुर्तझा ट्रंकवाला, ऋषिकेश सोनवणे व सुरज शिंदे यांनी आतापर्यंत हंगामात प्रत्येक सामन्यात योगदान दिले आहे. तर, गोलंदाज निकित धुमाळ हा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलाय. त्याच्या जोडीला सचिन भोसले व रोहन-रोशन ही फिरकी जोडी दिसते. कोल्हापूर टस्कर्स संघासाठी कर्णधार राहुल त्रिपाठी व अंकित बावणे या अनुभवी जोडीला धावा बनवाव्या लागतील. तर, धनराज शिंदे व सिद्धार्थ म्हात्रे या मधल्या फळीतील फलंदाजांवर मोठी भिस्त असेल. गोलंदाजीत रजनीश गुरबानी व श्रेयस चव्हाण यांनी आत्तापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केलेली दिसते.

सायंकाळच्या सत्रात होणाऱ्या या सामन्यासाठी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. मात्र, फिरकी गोलंदाज अधिक प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. मागील दिवसांपासून दिसत असलेल्या सामन्यानुसार प्रेमाने फलंदाजी केल्यास मोठी धावसंख्या उभी राहू शकते. हा सामना सायंकाळी सात वाजता गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होईल.

संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
पुणेरी बाप्पा- यश नाहर, मुर्तझा ट्रंकवाला, ऋषिकेश सोनवणे, सुरज शिंदे, सोहन जमाले, यश क्षीरसागर, नौशाद शेख, रामकृष्ण घोष, निकित धुमाळ, रोशन वाघसरे व सचिन भोसले.
इम्पॅक्ट प्लेअर-रोहन खरात

पीबीजी कोल्हापूर टस्कर्स- राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, सचिन धस, सिद्धार्थ म्हात्रे, श्रीकांत मुंढे, विशांत मोरे, धनराज शिंदे, श्रेयस चव्हाण, रजनीश गुरबानी, आत्मन पोरे, अथर्व डाकवे
इम्पॅक्ट प्लेअर- दिपक डांगी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---