---Advertisement---

मयंकची विकेट अक्षर पटेलसाठी ठरली विक्रमी, खास शतक पूर्ण केलेच; अष्टपैलूंचा रेकॉर्डही नावावर झाला

On: मंगळवार, मे 17, 2022 12:10 AM
Axar-Patel
---Advertisement---

आयपीएलच्या मैदानात सोमवारी (१६ मे) दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आमना सामना झाला. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना १७ धावांनी नावावर केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने मर्यादित २० षटकांमध्ये १५९ धावा उभ्या केल्या. दिल्लीचा संघ  गोलंदाजीसाठी आला, तेव्हा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने खास विक्रमाची नोंद केली.

दिल्ली कॅपिटल्सने दिलेले १६० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी पंजाब किंग्जचे फलंदाज खेळपट्टीवर आले. पहिल्या विकेटसाठी सलामीवीरांनी ३८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर पंजाबचे मध्यक्रमातील फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. पंजाबचा कर्णधार मयंक अगरवाल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि एकही धाव न करता तंबूत परतला. दिल्लीचा अष्टपैलू अक्षर पटेलने मयंकला त्रिफळाचीत केले. अक्षरने या सामन्यात मयंक आणि ऋषी धवनची विकेट घेतली. मयंकच्या विकेटनंतर अक्षरने आयपीएलमध्ये वैयक्तिक १०० विकेट्स पूर्ण केल्या.

यासह अक्षर पटेल (Axar Patel) आयपीएलमध्ये १००० पेक्षा अधिक धावा आणि १०० पेक्षा अधिक विकेट्स घेणारा चौथा खेळाडू ठरला आहे. मयंक अगरवालला बाद केल्यानंतर अक्षर या यादीत नव्याने सहभागी होऊ शकला. आयपीएलमध्ये वैयक्तिक १००० धावा आणि १०० विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत सर्वात पहिले नाव आहे वेस्ट इंडीजच्या ड्वेन ब्रावोने. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय दिग्गज अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि तिसऱ्या क्रमांकावर सुनील नरेन आहे. अक्षर पटेल आता या यादीत चौथ्या खेळाडूच्या रूपात सहभागी झाला आहे.

आयपीएलमध्ये १००० पेक्षा जास्त धावा आणि १०० पेक्षा अधिक विकेट्स घेणारे खेळाडू
ड्वेन ब्रावो
रवींद्र जडेजा
सुनील नरेन
अक्षर पटेल

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने ७ विकेट्सच्या नुकसानावर १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ हे लक्ष्य गाठू शकला नाही. पंजाबने मर्यादित २० षटकात ९ विकेट्सच्या नुकसानावर १४२ धावा केल्या. परिणामी दिल्ली कॅपिटल्सने पंजाबला १७ पराभूत केले. पराभवानंतर प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा पंजाबचा मार्ग अधिकच अवघड झाला आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

अरे देवा! श्रीलंकन फलंदाजाने बांगलादेशच्या यष्टीरक्षकाच्या डोक्यात मारली बॅट, पाहा पुढे काय झाले

अरेरे! आधी ९९, आता १९९; अँजेलो मॅथ्यूजच्या नावावर झाला कसोटी क्रिकेटमधील ‘नकोसा’ विश्वविक्रम

धक्कादायक! उष्माघातामुळे क्रिकेटरचा मैदानातच मृत्यू, संघाच्या विजयानंतर करत होता सेलिब्रेशन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---