इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामाचा १६ वा सामना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स या संघांमध्ये ८ एप्रिलला मुंबईच्या ब्रेबाॅर्न स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरातने पंजाबला ६ विकेट्सने पराभूत करत हा सामना देखील आपल्या नावे केला. गुजरात संघाच्या विजयात जेवढे शुबमन गिल याचे योगदान आहे, तेवढेच तेवातियाचे सुद्धा आहे. गुजरात संघाला शेवटच्या २ चेंडूवर १२ धावांची गरज होती, तेव्हा तेवातियाने (Rahul Tewatia) दोन षटकार मारुन संघाला शानदार विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याचे सर्वजण कौतुक करत आहेत.
पंजाबविरुद्धच्या विजयानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) देखील तेवातियाचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, “ज्या पद्धतीने सामन्यात चढ-उतार येत होते ते पाहून मी स्तब्ध झालो होतो. तेवातियाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. क्रिजवर उतरल्या उतरल्या मोठे शाॅट खेळणे कठीण असते. तरी सुद्धा दबावाच्या परिस्थितीत अशी कामगिरी करणे खूप चांगले आहे.”
गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने पंजाबला ९ विकेट गमावल्यानंतर २०षटकात १८९ वरच रोखले. लियाम लिविंगस्टोनने २७ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ६४ धावांची खेळी खेळली. शिखर धवनने ३५ धावा केल्या तर जीतेश शर्माने २३ आणि राहुल चाहरने २२ धावा केल्या. गुजरातकडून राशिद खानने ३ तर दर्शन नालकंडेने २ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शामी, फर्ग्युसन आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतला.
गुजरातकडून शुबमन गीलने ५९ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ९६ धावा केल्या. तर हार्दिकने २७ आणि सुदर्शनने ३५ धावा केल्या. तसेच तेवातियाने दोन षटकार लगावत संघाला ६ विकेट्सने विजय मिळवून दिला. गुजरातचा आयपीएल २०२२ मधील हा सलग तिसरा विजय आहे तर पंजाब किंग्सने ४ पैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. गुणतालिकेत पंजाब किंग्स सहाव्या तर गुजरात दूसऱ्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL2022| चेन्नई वि. हैदराबाद सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
बेंगलोरला विजयाच्या हॅट्रिकची संधी, तर मुंबईचे खाते उघडण्यावर लक्ष; जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही