---Advertisement---

PBKS vs KKR: मुल्लांपूरची खेळपट्टी कोणाच्या बाजूने, फलंदाज की गोलंदाज? जाणून घ्या संपूर्ण माहिती

---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील 31 वा सामना आज 15 एप्रिल रोजी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब किंग्स आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये खेळला जाणार आहे. हा सामना मुलांपूर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल, जे की पंजाबचे घरेलू मैदान आहे. चला तर जाणून घ्या की येथील खेळपट्टी कशी असणार आहे? आणि या मैदानावर आयपीएलच रेकॉर्ड कसे राहिल आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाबद्दल बोलायचे झाल्यास, संघाने 6 सामन्यांमधील 3 सामने जिंकले आहेत, तसेच 3 सामने गमावले आहेत. जर आज संघ जिंकला तर पॉईंट्स टेबलवर चौथ्या स्थानावर येईल, सध्या संघ पाचव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्सने पाच सामन्यांमधील तीन सामने जिंकले आहेत,पण नेटच्या आधाराने संघ कोलकाता संघाच्या पाठोपाठ सहाव्या नंबरवर आहे जर पंजाब संघ विजयी झाला तर तो सुद्धा चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो.

या स्टेडियमला पंजाब किंग्सने 2024 पासून त्यांचं होम ग्राउंड बनवल आहे. त्या हंगामात या मैदानावर 5 सामने खेळले गेले होते. या हंगामात आत्तापर्यंत या स्टेडियमवर 2 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये तीन डावांमध्ये 200 च्या पुढे धावसंख्या गेली आहे. येथील सर्वात मोठी धावसंख्या म्हणजे 219 धावांची आहे, जी पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध या हंगामात केली होती.

एकूण सामने: 7
प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला: 4
प्रथम गोलंदाजी करणारा संघ विजयी: 3
टॉस जिंकणाऱ्या संघाने जिंकले: 3
टॉस हारणाऱ्या संघाने जिंकले: 4

यावेळेस येथे फलंदाजांसाठी खूप काही असणार आहे. या खेळपट्टीवर फलंदाजांना अधिक मदत मिळू शकते. फलंदाज वेगवान गोलंदाजांच्या विरुद्ध जास्त धावा करू शकतात. त्यामुळे पावर-प्ले महत्त्वाचा ठरेल. तसेच टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य राहील.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---