बुधवारी (दि. 3 मे) पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स संघात आयपीएल 2023चा 46वा सामना पार पडला. या सामन्यात पंजाबने 20 षटकात 3 विकेट्स गमावत 214 धावांचा आकडा गाठला होता. दुसरीकडे, मुंबईने हे आव्हान 18.5 षटकात 216 धावा ठोकत सामना खिशात घातला. या सामन्यात ईशान किशन याने 75 धावांची, तर सूर्यकुमार यादवने 66 धावांची खेळी साकारली होती. या विजयानंतर ईशानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. दुसरीकडे, पंजाबसाठी लियाम लिव्हिंगस्टोन याने नाबाद 85 धावांची खेळी साकारली होती.
काय म्हणाला रोहित?
या सामन्यात पंजाब किंग्सचे 200हून अधिक धावांचे आव्हान सहजरीत्या पार केल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने मोठे भाष्य केले. तो म्हणाला की, “जेव्हा मी खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा टी20 क्रिकेटमध्ये 140 धावसंख्याही सुरक्षित धावसंख्या होती. मात्र, आता तर या आयपीएलची सरासरी धावसंख्या ही 180हून अधिक आहे. तसेच, 200च्या धावसंख्येचा आरामात पाठलाग केला जाऊ शकतो. सूर्याने आज जे केले, ते तो अनेक वर्षांपासून करत आला आहे. त्याला किशननेही चांगली साथ दिली.”
रोहितकडून तिलक वर्मा आणि टीम डेविडचे कौतुक
रोहित शर्मा याने तिलक वर्मा (Tilak Varma) आणि टीम डेविड (Tim David) यांचे कौतुक केले. तो म्हणाला की, “तिलक आणि डेविडने काम फत्ते केले. हंगामापूर्वी आम्ही चर्चा केली होती की, आपण न घाबरता आणि परिणामांची चिंता न करता खेळायचे आहे. ईशान फक्त दिसायला छोटा आहे, पण चेंडूवर कडक मारा करतो. तो यासाठी खूप मेहनतही करतो.”
Ishan Kishan is adjudged Player of the Match for his match winning knock of 75 as @mipaltan win by 6 wickets 👏👏
Scorecard – https://t.co/QDEf6eqX22 #TATAIPL #PBKSvMI #IPL2023 pic.twitter.com/mxWT55vICt
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2023
सहाव्या स्थानावर पोहोचला मुंबई संघ
खरं तर, हा मुंबईचा हंगामातील पाचवा विजय होता. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत सहावे स्थान गाठले. यापूर्वी मुंबई संघ सातव्या स्थानावर होता. मुंबईने 9 सामन्यात 5 विजय आणि 4 पराभवांसह 10 गुण मिळवले. मुंबईने सलग 2 सामने जिंकून पुनरागमन केले आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्स संघाला गुणतालिकेत एक स्थानाचे नुकसान झाले आहे. पंजाब सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानी घसरला आहे. पंजाबचे 10 सामन्यात 5 विजय आणि 5 पराभवांसह 10 गुण झाले आहेत. (pbks vs mi skipper rohit sharma praises suryakumar ishan kishan and tilak varma after the win over punjab)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईविरुद्ध काळीज तोडणारा पराभव होताच धवनची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘दुर्दैवाने आम्ही…’
‘जे कोणी असेल बंदी घाला…’, विराट-गंभीर अन् नवीन वादावर सेहवागचे रोखठोक विधान, वाचा सविस्तर