इंडियन प्रीमियर लीगमध्ये काल (दि. 9 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांत धरमशाला येथे सामना झाला. दोन्ही संघांसाठी स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्वाचा होता. अशा या महत्वाच्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जवर ‘विराट’ विजय साकारला. त्यामुळे आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स पाठोपाठ पंजाब किंग्ज संघाचेही आव्हान संपुष्टात आले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाबवर 60 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे बंगळुरूच्या प्ले ऑफ फेरीच्या आशा जिवंत आहेत. विराट कोहलीची 92 धावांची खेळी बंगळुरूच्या विजयासाठी निर्णायक ठरली. बंगळुरूने विराटच्या 92 धावांच्या जोरावर 241 धावांची मजल मारली. बंगळुरूच्या या महाआव्हानाचे पाठलाग करताना पंजाबचा डाव अवघ्या 1841 धावांत आटोपला. ( PBKS vs RCB Live Royal Challengers Bengaluru Beat Punjab Kings By 60 Runs )
गुणतालिकेत आता कोलकाता आणि राजस्थान प्रत्येकी 16 गुणांसह प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहेत. तर, सनरायझर्स हैदराबादचा संघ 14 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र होण्याच्या स्थितीत आहे. चेन्नई, दिल्ली, लखनौ या तीन संघांचे 12 गुण झाले असल्याने त्यांच्यात तीव्र स्पर्धा असेल. तर प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरण्यासाठी या तीन संघासोबत आता बंगळुरुच्याही आशा जिवंत आहेत. बंगळुरूचे सध्या 10 गुण झालेत, त्यांच्यासाठी प्ले ऑफची शर्यत गाठण्यासाठी इतर संघांवर देखील अवलंबून राहावे लागेल.
Hot form continues… 🥵
FOUR in FOUR! 🙏#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #PBKSvRCB pic.twitter.com/kOuaVWaTCG
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 9, 2024