मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाला शनिवारी (२६ मार्च) सुरुवात झाली आहे. या हंगामातील तिसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स (RCB vs PBKS) यांच्यात सामना झाला. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० ला सुरुवात झाली. त्यापूर्वी संध्याकाळी ७ वाजता नाणेफेक झाली. यावेळी पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
हा सामना दोन्ही संघांच्या कर्णधारासाठी खास होता. बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) आणि पंजाबचा कर्णधार मयंक अगरवाल (Mayank Agarwal) या दोघांचाही हा आयपीएल कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता. हा सामना मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर झाला.
दरम्यान, या सामन्यासाठी आरसीबीकडून अनुज रावतला सलामीलासाठी संधी देण्यात आली. तसेच त्याच्याबरोबर डू प्लेसिस फलंदजीला येईल. आरसीबीने या सामन्यासाठी फाफ डू प्लेसिस व्यतिरिक्त शेरफेन रुदरफोर्ड, डेव्हिड विली आणि वनिंदू हसरंगा या परदेशी खेळाडूंना संधी दिली. तसेच पंजाबने लियाम लिव्हिंगस्टोन, भानुका राजपक्षे, ओडेन स्मिथ या परदेशी खेळाडूंना अंतिम ११ जणांमध्ये स्थान दिले.
असे आहेत ११ जणांचे संघ
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, दिनेश कार्तिक, शेरफेन रुदरफोर्ड, विराट कोहली, डेव्हिड विली, वनिंदू हसरंगा, शाहबाझ नदीम, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, आकाश दीप
पंजाब किंग्स
मयंक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, भानुका राजपक्षे, ओडेन स्मिथ, शाहरुख खान, राज बावा, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, संदीप शर्मा, राहुल चाहर
महत्त्वाच्या बातम्या –
एका नो बॉलमुळे ३ वेळा तुटलंय करोडो भारतीयांचं हृदय, आता महिला संघही विश्वचषकातून झालाय बाहेर
मुंबईकडून ‘असा’ कारनामा करणाऱ्या खेळाडूंमध्ये इशान किशन अव्वल; सचिनलाही टाकलं मागे