राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात मंगळवारी (२१ सप्टेंबर) दुबईच्या मैदानावर अतिशय रोमांचक लढत पाहायला मिळाली. विजयाच्या अगदी जवळ पोहोचलेल्या पंजाब संघाला अंतिम षटकात अवघ्या २ धावांनी पराभवास सामोरे जावे लागले. त्यांना विजयासाठी २० व्या षटकात ४ धावांची गरज होती आणि अजून ८ विकेट्स शिल्लक होत्या. परंतु राजस्थानचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी याने अविश्वसनीय गोलंदाजी प्रदर्शन करत पंजाबच्या तोंडून विजयाचा घास काढून घेतला. परंतु अंतिम षटकात संघाची झालेली अवस्था पाहून पंजाबचा कर्णधार केएल राहुल याचे मात्र तोंड पडले होते.
शेवटच्या २० व्या षटकात पंजाबकडून निकोलस पूरन आणि ऍडम मार्करम फलंदाजी करत होते. पंजाबला विजयासाठी केवळ ४ धावांची गरज असल्याने त्यांचा विजय जवळजवळ निश्चित दिसत होता. अशात या षटकातील पहिला डॉट बॉल दिल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मार्करमने १ धाव काढली. मग स्ट्राईकवर आलेल्या विस्फोटक फलंदाज पूरनला त्यागीने दमदार चेंडू टाकत संजू सॅमसनच्या हातून झेलबाद केले.
त्यानंतर कार्तिकने नुकताच फलंदाजीला आलेल्या दिपक हुड्डालाही त्याने खातेही न खोलता षटकातील पाचव्या चेंडूवर पव्हेलियनला धाडले. पुढे षटकातील शेवटच्या चेंडूवरही त्याने एकही धाव दिली नाही अन् संघाला अविश्वसनीय असा विजय मिळवून दिला. राजस्थानच्या या अनपेक्षित प्रदर्शनानंतर पंजाबचा संघनायक राहुलचे तोंड पाहण्यासारखे झाले होते.
राजस्थानचा संघ विजयाच्या जल्लोषात रंगला होता. तर डगआऊटमध्ये बसलेल्या राहुलला या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. तो स्तब्ध झाल्याप्रमाणे प्रतिक्रिया देताना कॅमेरात कैद झाला. अगदी राहुलप्रमाणेच पंजाब संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे हेदेखील नाराज झाल्याचे दिसले.
WHAT. A. WIN! ???? ????
Simply stunning how @rajasthanroyals have pulled off a two-run victory from the jaws of defeat. ???? ????
Scorecard ???? https://t.co/odSnFtwBAF #VIVOIPL #PBKSvRR pic.twitter.com/16m71yzAOW
— IndianPremierLeague (@IPL) September 21, 2021
पंजाब संघाचा हा या हंगामातील सहावा पराभव होता. त्यांनी आतापर्यंत ९ सामने खेळले असून फक्त ३ सामने जिंकले आहेत. त्यामुळे ६ गुणांसह हा संघ गुणतालिकेत खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे राजस्थानने हा सामना जिंकत गुणतालिकेत पाचव्या स्थानी उडी घेतली आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यांपैकी हा त्यांचा चौथा विजय होता.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाब विरुद्ध राजस्थान सामना फिक्स होता? पंचांच्या ‘त्या’ चूकीमुळे संतप्त नेटकऱ्यांचे गंभीर आरोप
कर्णधारानेच काढला कर्णधाराचा काटा; हवेत उडी मारत राहुलने एकहाती टिपला सॅमसनचा अवघड झेल
हा कोणता सरपटणारा प्राणी? लाईव्ह सामन्यात निकोलसने केलं असं काही की हसू हसू दुखेल पोट






