आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्स संघाची कामगिरी तळ्यात-मळ्यात राहिली. चांगल्या सुरुवातीनंतर संघ रूळावरून घसरला. सीजनच्या आपल्या तेराव्या सामन्यातही दिल्ली कॅपिटल्सने त्यांना पराभूत केल्याने स्पर्धेतील त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. २०१४ नंतर पंजाब एकदाही प्ले ऑफपर्यंत पोहचू शकला नाही. संघाच्या या सततच्या खराब कामगिरीचे खापर आता संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर फोडले जात आहे.
कुंबळे यांच्यावर सोशल मीडियातून टीका
सोमवारी (१६ मे) पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील झालेला सामना दिल्लीने १७ धावांनी जिंकला. यासह दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम राहिल्या, तर पंजाब प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर पडला. यानंतर पंजाबच्या चाहत्यांनी रोष व्यक्त केला. त्यांनी संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर सोशल मीडियातून टीका केली. गेल्या चार वर्षापासून कुंबळे संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. मात्र, या चार वर्षात पंजाब संघ एकदाही प्ले ऑफपर्यंत पोहचू शकला नाही. दिल्ली विरुद्ध पराभूत झाल्यानंतर एका चाहत्याने ट्विट केले की, कुंबळे हटाओ पंजाब बचाओ
https://twitter.com/CHDYYZ/status/1526249012487237636?t=DKOhUlKyuZPIsFu9Z1LYSA&s=19
दुसऱ्या चाहत्याने लिहिले, पंजाबने सर्वात पहिल्यांदा अनिल कुंबळे यांचा बंदोबस्त करावा.
https://twitter.com/CrowBastard_/status/1526248698514092032?t=oV9kIyU5qYq2MtJAVWkGfA&s=19
अन्य एका चाहत्याने विनंती करत लिहिले, कुंबळे साहेब तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा द्या. आम्ही तुम्हाला असे पाहू शकत नाही.
https://twitter.com/CricCrazyBlog/status/1526245011725369344?t=ejiF8rMwNUwKYsyCYdX3NA&s=19
पंजाबची हंगामात खराब कामगिरी
यावर्षी संपूर्णपणे नवा संघ बांधलेल्या पंजाब किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभूत करत चांगली सुरुवात केली होती. मात्र, स्पर्धेच्या मध्यात त्यांची विजयी लय गेली. त्यानंतर त्यांनी सलग तीन विजय मिळवत पुन्हा एकदा प्लेऑफकडे मार्गक्रमण सुरू केले. मात्र, दिल्ली विरुद्ध पराभूत झाल्याने त्यांचे यावर्षीदेखील तिथपर्यंत पोचायचे स्वप्न अधुरे राहिले. कर्णधार मयंक अगरवाल याचे अपयश संघाला मोठ्या प्रमाणात भोवले.
महत्वाच्या बातम्या-
एकदम कडक! अँडरसनने जबरदस्त स्विंग करत उडवल्या जो रुटच्या दोन दांड्या, Video व्हायरल
फक्त १० सामन्यांत चहल मोडणार विराटचा ९७३ आयपीएल धावांचा विक्रम? पाहा नक्की काय आहे प्रकरण
इंडिया टूरसाठी दक्षिण आफ्रिका टी२० संघाची घोषणा; बेबी एबी बाहेर पण दुसरा मुंबईकर…






