इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील २३व्या सामन्याची सांगता बुधवारी (दि. १३ एप्रिल) झाली. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात पंजाब संघाने १२ धावांनी विजय मिळवला. हा पंजाबचा हंगामातील तिसरा विजय होता. यापूर्वी खेळलेल्या ४ सामन्यात त्यांना २ सामन्यात विजय आणि २ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईविरुद्धच्या विजयाचा शिल्पकार कागिसो रबाडा ठरला. याव्यतिरिक्त फलंदाजीतून कर्णधार मयंक अगरवाल आणि शिखर धवनने मोठे योगदान दिले होते.
या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबई संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १९८ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई संघाचा डाव १८६ धावांवर संपुष्टात आला.
यावेळी मुंबई संघाकडून फलंदाजी करताना डेवाल्ड ब्रेविसने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २५ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकार खेचत ४९ धावा केल्या. याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादवने ४३, तिलक वर्माने ३६ आणि कर्णधार रोहित शर्माने २८ धावांचे योगदान दिले होते. या खेळाडूंव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. कायरन पोलार्ड फक्त १० धावाच करू शकला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
यावेळी पंजाबकडून गोलंदाजी करताना ओडियन स्मिथने शानदार कामगिरी केली. स्मिथने ३ षटके गोलंदाजी करताना ३० धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त कागिसो रबाडाने ४ षटके गोलंदाजी करताना २९ धावा देत २ विकेट्स घेतल्या, तर वैभव अरोराने १ विकेट्स आपल्या नावावर केली.
Punjab Kings return to winning ways! 👏 👏
The Mayank Agarwal-led unit register their third win of the #TATAIPL 2022 as they beat Mumbai Indians by 12 runs. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/emgSkWA94g#TATAIPL | #MIvPBKS pic.twitter.com/fupx2xD2dr
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजाबकडून शिखर धवनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५० चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ७० धावा केल्या. तसेच, कर्णधार मयंक अगरवालने कर्णधारपदाला साजेशी अशी अर्धशतकी खेळी केली. त्याने ३२ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकार मारत ५२ धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त यष्टीरक्षक जितेश शर्माने ३० धावांचे योगदान दिले. त्यांच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाने २० धावांचा आकडा पार केला नाही.
यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना बेसिल थंपीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. ४ षटके गोलंदाजी करताना त्याने ४७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह आणि मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या.
मुंबई संघाचा हा दारुण पराभव होता. त्यांना गुणतालिकेत वर येण्याची संधी होती. मात्र, या पराभवानंतर ते पुन्हा एकदा तळातच राहिले. मात्र, पंजाब संघाला गुणतालिकेत फायदा झाला असून ते तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शंभराव्या आयपीएल डावात मयंकची शानदार फिफ्टी; कर्णधार म्हणून पहिल्यांदाच केला खास कारनामा
हे नाही पाहिलं, तर काय पाहिलं? टी२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात घेतल्या गेल्या ६ विकेट्स, VIDEO VIRAL