इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना साउम्पटन येथे चालू आहे. हा सामना संपल्यानंतर २८ ऑगस्टपासून दोन्ही संघात ३ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या टी२० मालिकेसाठी पाकिस्तानने काल (शुक्रवारी) त्यांचा १७ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. PCB Announce Pakistan 17 Members T20 Squad
पाकिस्तान क्रिकेट बार्डाने जाहीर केलेल्या संघात बऱ्याच महिन्यांपासून दूर असलेल्या माजी कर्णधार सर्फराज अहमद याने पुनरागमन केले आहे. ही टी२० मालिका २८ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तर, दूसरा सामना ३० ऑगस्ट आणि तिसरा सामना १ सप्टेंबरला खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने इंग्लंडमधील मॅंचेस्टर येथील मैदानावर खेळले जाणार आहेत. तिसऱ्या टी२० सामन्याने पाकिस्तानचा इंग्लंड दौरा समाप्त होईल.
यष्टीरक्षक फलंदाज अहमदने त्याचा शेवटचा टी२० सामना ऑक्टोंबर २०१९मध्ये श्रीलंकाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याच्याकडून संघाचे नेतृत्त्वपद काढून घेण्यात आले. शिवाय त्याला संघातूनही बाहेर करण्यात आले. अहमदव्यतिरिक्त पाकिस्तान टी२० संघात वेगवान गोलंदाज वहाब रियाज आणि सलामीवीर फलंदाज फखर जमान यांचेही पुनरागमन झाले आहे. संघातील सर्व खेळाडू पहिल्यांदाच बाबर आझमच्या नेतृत्त्वाखाली खेळतील.
पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि निवडकर्ता मिस्बाह उल हक यांनी सांगितले की, “हा जवळपास तो संघ आहे, जो आमच्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरुपात खेळणार आहे. संघाचा पाया राखण्यासोबतच आम्ही हैदर अलीसारख्या युवा खेळाडूंनाही संघात सामाविष्ट केले आहे, ज्यांनी पीएसएल, १९ वर्षांखालील विश्वचषक आणि प्रथम श्रेणी क्रिकेट क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केले आहे. तसेच नसीम शाहच्या रुपात आम्हाला पर्यायी खेळाडूदेखील लाभला आहे.
असा आहे पाकिस्तान संघ –
बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, हैदर अली, हॅरिस रउफ, इफ्तिकार अहमद, इमाद वसीम, खुशदिल शाह, मोहम्मद हाफीज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिजवान, मोहम्मद आमिर, नसीम शाह, सर्फराज अहमद, शादाब खान, शाहीन शाह अफरीदी, शोएब मलिक आणि वहाब रियाज.
महत्त्वाच्या बातम्या –
शून्यावर बाद न होता आयपीएलच्या एका हंगामात तब्बल ८२५ धावा ठोकणारा धुरंदर फलंदाज
अर्जून पुरस्कार जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे म्हणाला…
आयपीएलमध्ये ‘या’ कारणामुळे होतो आरसीबी संघाचा ३० टक्के पराभव; जाणून घ्या स्वत: चहलच्या तोंडून…
ट्रेंडिंग लेख –
निवृत्तीनंतर आता या ५ क्षेत्रात दिसू शकतो एमएस धोनी
भारतीय संघासाठी या ३ टी-२० सामन्यात सुरेश रैनाने होता कर्णधार