पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज (Pakistan vs West Indies) संघात आगामी 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. दोन्ही संघ पहिल्या कसोटीसाठी (17 जानेवारी) रोजी आमने-सामने असणार आहेत. या दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आपला संघ घोषित केला आहे. शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ मैदानात उतरताना दिसणार आहे. पण लाजिरवाणी गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानने संघात 7 बदल केले आहेत.
अलिकडेच पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर, पीसीबीने संघात अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा कर्णधार शान मसूद (Shan Masood) तसेच बाबर आझमला (Babar Azam) संधी दिली आहे. या दोन्ही खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध चांगली कामगिरी केली होती. सौद शकील (Saud Shakeel), कामरान गुलाम (Kamran Ghulam), खुर्रम शहजाद (Khurram Shahzad), मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan), नोमान अली (Noman Ali) आणि सलमान अली आगा (Salman Ali Agha) यांनाही पुन्हा संधी मिळाली आहे.
पाकिस्तानने आपल्या संघात फिरकी गोलंदाजीचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी ऑफ स्पिनर साजिद खान आणि गूढ फिरकी गोलंदाज अबरार अहमद यांना संघात समाविष्ट केले आहे. सलामीवीर इमाम-उल-हक आणि मोहम्मद हुरैरा, सॅम अयुब यांचादेखील समावेश केला आहे.
वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघ- शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, इमाम-उल-हक, कामरान गुलाम, काशिफ अली, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नोमान अली, रोहेल नझीर (यष्टीरक्षक), साजिद खान, सलमान अली आगा
पाकिस्तान-वेस्ट इंडिज संघातील 2 कसोटी सामन्यांचे वेळापत्रक-
पहिला कसोटी सामना (17 ते 21 जानेवारी)
दुसरा कसोटी सामना (25 ते 29 जानेवारी)
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा पुढे का ढकलली? कारण खूप ‘गंभीर’!
सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीचं पदार्पणातच शतक! महाराष्ट्राची सेमीफायनलमध्ये धमाकेदार एंट्री
कोहलीचा ‘विराट’ विक्रम धोक्यात! यशस्वी जयस्वाल लवकरच करणार मोठा पराक्रम