इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर पाकिस्तान संघ आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचला आहे. ज्यामध्ये संघाला मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये मालिका खेळायची आहे. या दौऱ्याची सुरुवात 4 नोव्हेंबरपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने होणार आहे. ज्यामध्ये संघाचे नेतृत्तव मोहम्मद रिझवानकडे आहे. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी अवघ्या 6 महिन्यांपूर्वी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त झालेले गॅरी कर्स्टन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने पाकिस्तानी संघाला मोठा धक्का बसला. पीसीबीसाठी हा मोठा धक्का होता. कारण संघ ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौऱ्यावर जाणार होता. आता पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांचे विधान समोर आले आहे. ज्यात त्यांनी कर्स्टन यांच्यावर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या मर्यादित षटकांच्या फॉर्मेटच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर गॅरी कर्स्टन यांनी कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. तर पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांची त्यांच्या निर्णयावर पहिलीच प्रतिक्रिया आता समोर आली आहे.
मोहसीन नक्वी यांनी एका अनौपचारिक चर्चेदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे की, कर्स्टनने पीसीबीसोबतच्या करारात समाविष्ट असलेल्या काही अटींचे उल्लंघन केले आहे. याबाबत आम्ही पुढाकार घेतला नाही. त्यांनीच आमच्यासोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. याव्यतिरिक्त मोहसीन नक्वी यांनी आपल्या वक्तव्यात आणखी काही सांगितले नाही. तसेच त्यांनी माहिती दिली की पीसीबीने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटसाठी नवीन मुख्य प्रशिक्षक शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि आतापर्यंत या प्रकरणी चार-पाच संभाव्य उमेदवारांशी बोलण्यात आले आहे.
गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा का दिला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पाकिस्तानी मर्यादित षटकांच्या संघाचा नवा कर्णधार निवडताना बोर्डाने कर्स्टन यांचे मत घेतले नाही. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये पुरेसा वेळ न घालवून कर्स्टनने कराराचा भंग केल्याचा दावा पीसीबीच्या सूत्रांनी केला आहे.
हेही वाचा-
टीम इंडियात फूट? रोहित-गंभीरमध्ये वाद? मालिका पराभवानंतर संघात गटबाजी
19 वर्षांपूर्वी बनला होता विश्वविक्रम! लांब केसांच्या ‘माही’नं आजच्याच दिवशी खेळली होती कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी
INDA VS AUSA; ऋतुराजची पुन्हा फ्लाॅप कामगिरी, 107 धावांत भारताचा डाव आटोपला..!