जेव्हापासून 2023च्या आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे, तेव्हापासून पाकिस्तान आणि भारत क्रिकेट बोर्डांमध्ये खटके उडत आहेत. नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्यात अनेक बदल दिसले आहे. त्यांनी रमीझ राजा यांच्याजागी नजम सेठी यांची नियुक्ती केली आहे. नुकतेच भारतीय क्रिकेट मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी आशिया चषक 2023च्या स्पर्धेची माहिती जाहीर केली. यावर नजम सेठी (Najam Sethi)यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जय शाह यांनी गुरूवारी (5 जानेवारी) आशिया क्रिकेट कौंसिल (एसीसी) अध्यक्षपदाची भुमिका पार पाडताना 2023 आणि 2024चे वेळापत्र त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले. यामध्ये आशिया चषक 2023 सप्टेंबर महिन्यात खेळला जाणार असे समोर येत आहे. हीच बाब पाकिस्तानला पटली नाही. कारण यजमान देशाला या स्पर्धेची ही अतिमहत्वाची माहिती जाहीर करण्याची संधीच मिळाली नाही. यामुळे संतापलेल्या सेठी यांनी ट्वीट करत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
सेठी यांनी ट्वीटमध्ये लिहिले, ‘जय शाह यांनी आशियातील 2023-24च्या स्पर्धांबाबत माहीती जाहीर केली. त्यामध्ये त्यांनी पाकिस्तान यजमान असूनसुद्धा आशिया चषक 2023 बाबतही सांगितले याबद्दल त्यांचे धन्यवाद. आता त्यांनी आमच्या पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) कॅलेंडरबाबतही सांगावे. यावर काही प्रतिक्रिया दिली तर चांगलेच.”
या प्रकरणाबाबत सेठी मीडियाशी बोलताना म्हणाले, “एसीसीचे अध्यक्ष जय शाहा यांनी एकट्याने निर्णय घेऊ नये. एकीकडे तुम्ही म्हणता, पाकिस्तानने भारतात येऊन विश्वचषक खेळावा आणि दुसरीकडे तुम्ही पाकिस्तानमध्ये येऊन क्रिकेट खेळू शकत नाही. पुढे कधी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली तर त्यातही नाही खेळणार का? हा काही क्रिकेटचा नियम नाही.”
Thank you @JayShah for unilaterally presenting @ACCMedia1 structure & calendars 2023-24 especially relating to Asia Cup 2023 for which 🇵🇰 is the event host. While you are at it, you might as well present structure & calendar of our PSL 2023! A swift response will be appreciated. https://t.co/UdW2GekAfR
— Najam Sethi (@najamsethi) January 5, 2023
आशिया चषक 2023च्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. तसेच यावर्षी वनडे विश्वचषक खेळला जाणार असल्याने आशिया चषकही वनडे स्वरुपात खेळला जाणार आहे. (PCB Chairman Najam Sethi Furious over Jay Shah for releasing ACC Calendar)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या पराभवास हार्दिक कारणीभूत! ‘हे’ तीन निर्णय विचारपूर्वक घेतले असते, तर जिंकला असता संघ
अर्शदीपच्या नो-बॉलमुळे कर्णधार हार्दिकवर तोंड लपवण्याची वेळ, व्हिडिओ व्हायरल