भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्या दरम्यान सुरू असलेले शीतयुद्ध शमण्याचे नाव घेत नाही. आगामी आशिया चषक व वनडे क्रिकेट विश्वचषकाच्या सहभागावरून मागील जवळपास सहा महिन्यांपासून दोन्ही बोर्ड आमने-सामने आहेत. अशातच आता माध्यमांशी बोलताना पीसीबी प्रमुख नजम सेठी यांनी मोठे भाष्य केले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजम सेठी यांनी शुक्रवारी (12 मे) माध्यमांशी बोलताना भारतावर निशाणा साधला आहे. सेठी म्हणाले,
“पाकिस्तानचा विश्वचषकातील सहभाग हा पूर्णता भारतावर अवलंबून असेल. भारतीय संघाने पाकिस्तानात येऊन आगामी आशिया चषक खेळावा. तसेच 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याचे लेखी आश्वासन द्यावे.”
भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी जेमतेम 5 महिने बाकी आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) पीसीबीने या विश्वचषकात सहभागी होण्याचे कोणतेही लेखी आश्वासन अद्याप दिलेले नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या विश्वचषकातील प्रवेशावर सध्या शंका निर्माण होत आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, भारताचा पाकिस्तान दौरा आणि पाकिस्तानचा भारत दौरा बीसीसीआय किंवा पीसीबीवर अवलंबून असणार नाही. त्यामुळे पीसीबी विश्वचषकातील सहभागाबाबत आयसीसीला कोणतेही आश्वासन देऊ शकणार नाही. बीसीसीआयप्रमाणे इथेही पाकिस्तान सरकार मान्यता देईल, सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतरच पीसीबी ठोस निर्णय घेऊ शकेल.
बंगळुरू-चेन्नईमध्ये रंगणार पाकिस्तानचे सामने ?
दरम्यान, सुरक्षेबाबतच्या कारणामुळे बीसीसीआयने विश्वचषकात पाकिस्तानचे बहुतांश सामने दक्षिण भारतात व्हावेत अशी योजना आखल्याचे समोर येत आहे. एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, भारत-पाकिस्तान सामने अहमदाबादमध्ये आणि उर्वरित पाकिस्तानचे सामने बंगळुरू किंवा चेन्नईमध्ये आयोजित केले जाऊ शकतात.
पाकिस्तान विश्वचषकात करू शकतो हायब्रीड मॉडेलची मागणी
पीसीबी विश्वचषकावेळी हायब्रीड मॉडेलची मागणी करू शकतो अशी शंका सध्या वर्तवली जाते. त्यानुसार पाकिस्तान आपले सामने पाकिस्तान अथवा श्रीलंकेत खेळू शकते. भारतीय संघाने आगामी आशिया चषकात अशाच प्रकारची मागणी केली होती. हे मागणी मान्य झाल्यानंतर, बांगलादेशने विरोध केला. त्यामुळे आशिया चषक श्रीलंकेत खेळला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
(PCB Chairman Najam Sethi Statement On Asia Cup And World Cup Participation)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामना जिंकला तरी रोहित म्हणतोय, “सूर्याने आमचा प्लॅन बिघडवला”, वाचा सविस्तर
‘हे केवळ त्याच्यासाठी’, दमदार कमबॅक केलेला चावला घेतोय आपल्याच मुलाकडून प्रेरणा