---Advertisement---

पाकिस्तानचे भविष्य ‘या’ माजी खेळाडूच्या हाती; सांभाळणार मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी

On: रविवार, डिसेंबर 20, 2020 11:15 AM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या बदलाचे वारे वाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान क्रिकेट मंडळाने अजहर अलीला कसोटी कर्णधार पदावरून हटवून ही जबाबदारी स्टार खेळाडू बाबर आझम वर सोपवली आहे. याच दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (PCB) शनिवारी (१९ डिसेंबर) घोषणा केली आहे की, माजी खेळाडू मोहम्मद वसीम पाकिस्तान संघाचा मुख्य निवडकर्ता असेल. वसीम मिसबाह उल हक याची जागा घेणार आहे..

मिसबाहने स्पष्ट केले होते की, त्याला संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करत असताना निवडकर्ता म्हणून दुहेरी भूमिका पार पाडणे अवघड जात आहे.

https://twitter.com/TheRealPCB/status/1340165871520636929

वसीम याची निवडकर्ता म्हणून पहिली जबाबदारी मायदेशात दक्षिण अफ्रिका विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी संघ निवडण्याची असणार आहे. दक्षिण अफ्रिका संघ जवळ- जवळ १४ वर्षांनंतर प्रथमच पाकिस्तानात क्रिकेट खेळणार आहेत. पाकिस्तान व दक्षिण अफ्रिका संघात २ कसोटी व ३ टी२० सामन्यांची मालिका पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणार आहे.

मोहम्मद वसीमने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये १८ कसोटी व २५ वनडे सामने खेळले आहेत. २०२३ चा विश्वचषक लक्षात घेता संघबांधणी करण्याचे महत्त्वाचे काम त्याच्यावर असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“दुसऱ्या कसोटी सामन्यात नका देऊ संधी”, पृथ्वी शॉच्या फ्लॉप खेळीला पाहून वैतागले समालोचक

“टीम इंडियाला रोहित शर्माची नितांत गरज, लवकरात लवकर संघात सहभागी करावे”

शास्त्रींची हाकालपट्टी करून ‘या’ दिग्गजाकडे सोपवावे प्रशिक्षकपद; कसोटीतील पराभवानंतर जोरदार मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---