मुंबई । कोरोना व्हायरसच्या सावटात पाकिस्तानचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर पोहचताच एक वाईट बातमी समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघास इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी कोणताच स्पॉन्सर मिळाला नाही. त्यामुळे संघाला आता शाहिद आफ्रिदी फाउंडेशनचा लोगो (जर्सी)ड्रेसवर लावावे लागणार आहे.
पीसीबीला स्पॉन्सर शोधण्यासाठी अपयश आले असल्याची बातमी बुधवारी दुपारी समोर आली आहे. पाकिस्तान संघाला स्पॉन्सर न मिळणे ही चिंताजनक बाब आहे. आधीच कोरोना व्हायरसमुळे पीसीबी आर्थिक संकटात सापडले आहे. यात कोणताही स्पॉन्सर न मिळाल्याने पीसीबीच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पाकिस्तानच्या संघाला इंग्लंड दौऱ्यात 3 कसोटी आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. दोन्हीं संघात पहिला कसोटी सामना पाच ऑगस्टपासून मँचेस्टर येथे खेळवला जाणार आहे. तर टी 20 मालिकेतील पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी मँचेस्टर येथे होणार आहे.
या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पाकिस्तानच्या दहा खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे पाकिस्तानचा संघ दोन टप्प्यात इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
विराट म्हणतो, त्याने माझ्यासाठी डोसा आणला; आता मी त्याला बिर्याणी…
फाफ डुप्लेसिसचा खुलासा; जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर यांच्यामध्ये आहे ही समानता
बंगाल टायगर सौरव गांगुलीने पाहिले होते भूत; फायर ब्रिगेड वाल्यांना बोलवले होते घरी