---Advertisement---

ब्रेकिंग! पाकिस्तान सुपर लीगला कोरोनाचा फटका; उर्वरित हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित 

---Advertisement---

कोविड-१९ महामारीची पहिली लाट संपल्यानंतर आता कुठे हळूहळू क्रिकेट क्षेत्र पुर्वपदावर येत आहे. अशात पाकिस्तानमध्येही टी२० लीग म्हणजेच पाकिस्तान सुपर लीग २०२१ चा हंगाम आयोजित करण्यात आला होता. परंतु या लीगमध्ये सहभागी झालेले तब्बल ७ सदस्य कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उर्वरित हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

पीएसएलमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण १ मार्च रोजी सापडला होता. इस्लामाबाद युनायटेड संघाचे प्रतिनिधित्त्व करत असलेला ऑस्ट्रेलियन फिरकीपटू फवाद अहमद सर्वप्रथम कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. त्यानंतर कराची किंग्स संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यासह २ परदेशी खेळाडू कोरोना संक्रमित झाले. त्यानंतर क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचा भाग असलेल्या टॉम बंटनने आपल्यासह ३ खेळाडू कोरोनाच्या कचाट्यात सापडल्याची माहिती दिली होती.

यानंतर गुरुवारी अजून ३ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ६ खेळाडूं आणि सपोर्ट स्टाफमधील १ सदस्य असे मिळून एकूण ७ जण मागील ४ दिवसात कोरोना संक्रमित झाल्याने पीएसएलच्या आयोजन समिती आणि फ्रँचायझींच्या मालकांची गुरुवारी (०४ मार्च) बैठक भरवण्यात आली. या बैठकित उर्वरित हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला.

पीसीबीने यासंबंधी माहिती दिली की, ‘नुकतेच कोरोना संक्रमणाचे ३ नवे रुग्ण सापडले आहेत. ते खेळाडू २ वेगवेगळ्या संघांचे आहेत. कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांची बुधवारी चाचणी करण्यात आली होती. पॉझिटिव्ह आढळलेले सर्व खेळाडू सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. एवढे खेळाडू कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने पीएसएलमधील सर्व सहभागी खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि संघ व्यवस्थापनाच्या सदस्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल. संघांनी परवानगी दिली तर त्यांना कोरोनाची लसही टोचवली जाईल.’

महत्त्वाच्या बातम्या-

व्हिडिओ: मोहम्मद सिराजची जबरा गोलंदाजी, चेंडू कळायच्या आधीच इंग्लिश कर्णधार पायचित 

ब्रेकिंग! पाकिस्तान सुपर लीगला कोरोनाचा फटका; उर्वरित हंगाम स्थगित 

अक्षरने बिघडवली इंग्लंडची सुरुवात, ‘हा’ विक्रम करणारा जगातील पहिलाच स्पिनर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---