टी२० विश्वचषकातील भारताविरुद्धच्या महत्वाच्या सामन्याआधी, पाकिस्तान संघाला एक मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचे ‘हाय परफॉर्मन्स कोचिंग’ प्रमुख ग्रँट ब्रॅडबर्न यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यूझीलंडचा माजी कसोटीपटू ब्रॅडबर्न यांनी ३ वर्षे पीसीबीला आपली सेवा दिली. ते सप्टेंबर २०१८ ते जून २०२० पर्यंत पाकिस्तान क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकही होते. यानंतर त्यांनी पाकिस्तानच्या कोचिंग विकासाची जबाबदारी स्वीकारली होती.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात ब्रॅडबर्न म्हणाले की, “पाकिस्तान क्रिकेटसोबत काम करणे ही अभिमानाची बाब आहे. मी छान आठवणी आणि अद्भुत अनुभव घेऊन येथून जात आहे. मला शिकण्याची उत्तम संधी दिल्याबद्दल मी पीसीबीचे आभार मानतो.”
रमीज राजा यांनी पीसीबीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ब्रँडबर्न हे पद सोडणारे पाचवे उच्च अधिकारी आहेत. त्यांच्या आधी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक, गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस, मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान आणि विपणन प्रमुख बाबर हमीद यांनी राजीनामा दिला आहे.
https://twitter.com/TheRealPCBMedia/status/1448871945760555010
पंचावन्न वर्षीय ब्रॅडबर्न म्हणाले की, कोरोना प्रोटोकॉलमुळे ते आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकले नाही. ते पुढे म्हणाले की, “माझी पत्नी मारी आणि तीन मुलांनीही मला पाकिस्तान क्रिकेटची सेवा करण्याची परवानगी देऊन खूप मोठा त्याग केला आहे. कोविड- १९ च्या नियमांमुळे त्यांना पाकिस्तानमध्ये प्रवास करणे आणि या देशाची कळकळ, प्रेम तसेच मैत्री अनुभवणे कठीण होऊन बसले होते. आता माझ्यासाठी माझ्या कुटुंबाला प्राधान्य देण्याची आणि पुढील प्रशिक्षणातील आव्हानांकडे जाण्याची वेळ आली आहे.
न्यूझीलंडचे ब्रॅडबर्न ऑफ स्पिन गोलंदाजी करायचे. त्यांनी न्यूझीलंडसाठी १९९० ते २००१ पर्यंत ७ कसोटी आणि ११ एकदिवसीय सामने खेळले होते. ब्रॅडबर्न यांनी न्यूझीलंड-अ आणि न्यूझीलंड १९ वर्षांखालील संघांचे प्रशिक्षकही होते. त्यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देशात कार्यरत असलेल्या सर्व ‘हाय परफॉर्मेंस सेंटरमध्ये’ काम करणाऱ्या सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची पातळी वाढवण्याची जबाबदारी दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-Photo: आयपीएलमधून मिळाला छोटा ब्रेक; बुमराहने पत्नी संजनासह ‘अशा’प्रकारे घालवला वेळ
-अफलातून! सतरा वर्षीय शेफालीने पहिल्याच सामन्यात रॉकेट थ्रो मारून फलंदाजाला केले धावबाद; एकदा पाहाच
-खुर्चीवर दोरीने बांधून ठेवलेला दिसला विराट; नेटकरी म्हणे, ‘भारत असाच टी२० विश्वचषक जिंकेल’






