पाकिस्तान क्रिकेट बोर्डने त्यांच्या खेळाडूंना मोठी भेट दिली आहे. पीसीबीने सर्व प्रकारच्या मॅच फीजमध्ये १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कसोटी आणि मर्यादित षटकांसाठी वेगवेगळे करार करण्याची देखील घोषणा केली आहे. तसेच त्यांच्या ६९ व्या बोर्ड ऑफ गवर्नंरच्या बैठकीत आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी १५ अब्ज रुपयांचे बजट मंजूर केले गेले होते, ज्यापैकी ७८ टक्के ही क्रिकेट उपक्रमांसाठी देण्यात आली आहे.
पीसीबीने सांगितेल आहे की, “चांगली कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंना बक्षीस प्रोत्साहित करण्यासाठी तसेच इतर देशांतील खेळाडूंच्या तुलनेत वेतनातील तफावत कमी करण्यासाठी बीओजीने पुरुष खेळाडूंच्या केंद्रीय कराराच्या संरचनेत खालील बदलांना मंजूरी दिली आहे.”
केंद्रीय करारातील खेळाडूंची संख्या २० वरून ३३ पर्यंत वाढवणे. डी श्रेणीच्या खेळाडूंना मिळणाऱ्या मॅच फीमध्ये वाढ. खेळ न खेळणाऱ्या सदस्यांना एकूण मॅच फीच्या ५० टक्के ते ७० टक्के आणि त्या भूमिकेसह येणाऱ्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांसाठी मोबदला. तसेच कर्णधारासाठी कर्णधार भत्ता सुरू करण्यात आला आहे. महिलांच्या केंद्रीय करारांची यादी १ जुलैला पुरुषांच्या करराच्या यादीसोबतच घोषित केली जाईल. सर्व श्रेणीमध्ये १५ टक्के वाढ केली गेली असेल. यापूर्वी एकूण २० महिला खेळाडूंना केंद्रीय करारात सामील केले जात होते, ती संख्या आता २५ पर्यंत वाढू शकते.
पाकिस्तान क्रिकेटचे अध्यक्ष रमीज राजांनी (Ramiz Raja) सांगितले की, “लाल आणि पांढऱ्या चेंडूच्या कराराचे विभाजन करण्यामागील विचार प्रक्रिया म्हणजे खेळाचा विकास आणि क्रिकेटचे महत्त्व ओळखणे. आमच्याकडे पुढच्या १६ महिन्यांमध्ये दोन विश्वचषक तसेच चार आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहेत. पांढर्या चेंडूतील अनुभवी खेळाडूंशी करार केल्याने आम्हाला दोन स्वतंत्र संघ विकसित करण्यात मदत होईल, जे एकाच वेळी पांढऱ्या आणि लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये सहभागी होऊ शकतील.”
पीसीबी अध्यक्षांनी पुढे असेही जाहीर केले की, पीसीबी सध्याच्या खेळाडूंसाठी एक विशेष गट स्थापन करेल, ज्यांना जगभरातील विविध T20 लीगमधून खेळण्याच्या ऑफर मिळतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘भारतावर मात, आशिया चषक ताब्यात’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे सुचक विधान
‘भारतावर मात, आशिया चषक ताब्यात’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे सुचक विधान