आशिया कपसारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीची दुखापत हा पाकिस्तान क्रिकेट संघासाठी मोठा धक्का आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज श्रीलंका दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. शाहीन आफ्रिदीच्या ताज्या स्कॅन आणि अहवालानंतर त्याला चार ते सहा आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. याचा अर्थ आशिया चषकाशिवाय तो इंग्लंडविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिकेतूनही बाहेर असेल.
पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापनाने आफ्रिदीच्या आशिया कपमधून बाहेर पडण्यासाठी बाबर आझमला जबाबदार धरले आहे. “संघाने आफ्रिदीच्या वर्कलोड मॅनेजमेंटची काळजी घेतली नाही, ज्याचा तो आता फटका सहन करत आहे.” असं म्हणत कनेरियाने पीसीबीवर या परीस्थितीचे खापर फोडले आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एशिया कप: टीम इंडियाकडून झाली मोठी चूक! ‘या’ मॅच विनरला संघात न घेण्याचा निर्णय येईल अंगलट
भारताच्या तिकडीला टोमणा मारणाऱ्या वकार युनिसला चाहत्यांनी दाखवला आरसा! सोशल मीडियावर होतोय ट्रेंड