येत्या २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक लढत चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी सरावाला सुरुवात केली आहे. २७ ऑगस्ट रोजी सुरु होमाऱ्या आशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यात हे संघ एकमेकांविरुद्ध स्पर्धेतील स्वतःचे अभियान सुरू करतील. पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानचा सराव करतानाचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यामध्ये त्याच्या फलंदाजीतील काही कमजोर दुवे पाहायला मिळाले.
भारताविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघ जोमात सरावाला लागला आहे. यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) याला त्यांचा फलंदाजी प्रशिक्षक मोहम्मद यूसुफ मार्गदर्शन करताना दिसला. यादरम्यान प्रशिक्षकाणे त्याला सांगितले की, चेंडू अजून जवळ आल्यानंतर खेळ. रिजवानने देखील तसेच केले. सराव सत्रातील व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला गेला आहे.
सराव सत्रात रिजवानने अनेक नो लुक शॉट्स मारले. परंतु, हे सर्व शॉट्स पाहिल्यानंतर एक गोष्ट समान दिसली. त्याने मारलेले बहुतांश शॉट्स हे खूप फ्लॅट होते. मैदानात अनेकदा अशा शॉट्समुळे फलंदाजाला विकेट गमावण्याची वेळ येत असते. तसेच त्याने मारलेल्या अनेक शॉट्स हे लेग साईडला मारले. ऑफ साईडला त्याने खूप कमी शॉट खेळले. व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट होते की, रिजवानसाठी ऑफ साईडला धावा करणे सोपी गोष्ट नाहीये. भारतीय गोलंदाज त्याची ही कमजोरी हेरून नक्कीच फायदा उचलतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.
📹 A peek into Mohammad Rizwan's power-hitting drill 👊#AsiaCup2022 pic.twitter.com/UfO11yXp9C
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 23, 2022
रिजवान पाकिस्तान संघाचा एक महत्वाचा फलंदाज असला, तरी सध्या तो अपेक्षित प्रदर्शन करताना दिसत नाहीये. शेवटच्या सात वनडे डावांमध्ये त्याने अवघ्या ८१ च्या स्ट्राईक रेटने आणि ३३.५० च्या सरासरीने २०१ धावा केल्या आहेत. त्याचा हा खराब फॉर्म पाकिस्तान संघासाठी खऱ्या अर्थाने चिंतेची बाब आहे. त्याचे सध्याचे प्रदर्शन पाहता कर्णधार बाबर आझमवरील दबाव अधिक वाढणार यात कसलीही शंका नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘तू आता चांगला नाचतोस!’ पुजाराने दिलेल्या उत्तरामुळे आकाश चोप्राची बोलती बंद
‘मी जगातील सर्वात महान फिरकीपटू’, ख्रिस गेलने खास शैलीत केले स्वत:चे कौतुक
‘उमरान मलिकला संधी द्यायला हवी होती!’ पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने चोळले जखमेवर मीठ