---Advertisement---

पुढच्या वर्षी भारतात येणार पाकिस्तान टीम, पीसीबीने भारताकडे मागितलं लिखीत आश्वासन

On: गुरूवार, जून 25, 2020 4:33 PM
---Advertisement---

मुंबई । भारतात 2021 साली टी 20 विश्वचषक आणि 2023 मध्ये वनडे विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. या दोन्हीं स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ सामील होणार आहे. या स्पर्धेपूर्वी पाकिस्तानने आयसीसीला बीसीसीआयकडून खेळाडूंना व्हिसा देणार या संबंधी लिखित पत्र मागितले आहे. कोणत्याही अडचणीविना पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा देण्याची मागणी केली आहे. 

पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान एका यूट्यूब चॅनलशी बोलताना म्हणाले की, “भारतात 2021 आणि 2023 साली होणाऱ्या आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानच्या संघास सामील करून घेण्यासंदर्भात मंजुरी मिळाली पाहिजे. व्हिजा संदर्भात कोणतीच अडचण येता कामा नये, यासाठी आधीच लिखित भारत सरकारकडून आश्वासन द्यावे.”

आयसीसीच्या पुढील बैठकीत टी20 विश्वचषकाचे नियोजन ऑस्ट्रेलिया करणार की भारत यावर निर्णय होणार आहे. खान याबाबत बोलताना म्हणाले की, “ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 विश्वचषक स्पर्धा होण्याची शक्यता फार कमी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 विश्वचषक नाही झाल्यास भारतात तो होण्याची शक्यता आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---