---Advertisement---

दुनियेला माहित नाही, पण ‘हा’ खेळाडू तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम आहे! – नासिर हुसैन

On: रविवार, जून 22, 2025 2:43 PM
---Advertisement---

इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी (Ingland Former captain Nasir Hussain on Ben Duckket) त्या फलंदाजाबद्दल भाष्य केले आहे, ज्याला त्यांनी तिन्ही फॉरमॅटमधील चांगला फलंदाज म्हटले आहे. स्काई क्रिकेटवर बोलताना इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी त्या फलंदाजाचे कौतुक केले आहे. माजी इंग्लंड कर्णधार बेन डकेटला (Ben Duckket) विश्व क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट मधला उत्तम फलंदाज म्हटले आहे.

बेन डकेटने भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावांमध्ये 62 धावांची पारी खेळली.
डकेटने बुमराह विरुद्ध शानदार अंदाजात फलंदाजी केली आणि इंग्लंडसाठी खेळपट्टीवर अडून राहिला, पण बुमराहने डकेटला बाद करून पवेलियनमध्ये परत पाठवले.

यानंतर माजी इंग्लड कर्णधार नासिर हुसेन यांनी बेन डकेट विषयी म्हटले, दुनिया बेन डकेटबद्दल जास्त भाष्य करत नाही, पण आपण बुमराह बद्दल खूप जास्त बोलतो की तो दुनियातील सर्वात चांगला गोलंदाज आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये तो शानदार पद्धतीने गोलंदाजी करतो, शानदार पद्धतीची त्याची गोलंदाजी असते. पण फलंदाजांमध्ये बघायचे झाल्यास बेन डकेट तिन्ही फॉरमॅटमध्ये शानदार फलंदाजांमध्ये एक आहे, असे मला वाटते.

नासिर हुसेन पुढे म्हणाले, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने शानदार पद्धतीने फलंदाजी केली. तसेच टी20 मध्ये सुद्धा त्याचं चांगलं रेकॉर्ड आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सुद्धा तो सातत्याने चांगली फलंदाजी करत आहे, तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या फलंदाजीमध्ये जी स्थिरता आहे, ती त्याला तिन्ही फॉरमॅटमधील चांगला फलंदाज बनवते.

इंग्लंडच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना बेन डकेटने 94 चेंडूत 62 धावा केल्या. ज्यामध्ये 9 चौकांरांचा समावेश होता. त्याने 34 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 2472 धावांचा समावेश आहे, तसेच 5 शतके आणि 14 अर्धशतके त्याने यावेळी झळकावली आहेत. याशिवाय त्याने 25 वनडे सामने खेळलेले आहेत, 1176 धावा केलेल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---