भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. भारतीय संघाला क्रिकेटच्या तिनही प्रकारात घवघवीत यश मिळवण्यामागे विराट कोहलीचे मोठे योगदान आहे. परंतु विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर त्याच्या नेतृत्वावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. अशातच पाकिस्तान संघाच्या यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल याने त्याचा बचाव केला आहे. तसेच टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देखील दिले आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य भारतीय संघाला न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून पराभूत केले होते. या पराभवानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशातच पाकिस्तान संघाचा यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल याने विराट कोहलीचा बचाव करत म्हटले आहे की, “क्रिकेट चाहत्यांनी हे विसरू नये की कोहलीने आपल्या संघासाठी आणि खेळाडूंसाठी काय केले आहे.” (people who have not even led a gull team are now giving india advice to remove Virat Kohli as a captain says Kamran Akmal)
कामरान अकमलने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, “विराट कोहली एमएस धोनीनंतर भारतीय संघाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे. त्याने आतापर्यंत ७० शतके झळकावली आहेत. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१९ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आहे. त्या सामन्यात तो पराभूत झाला, परंतु यात त्याची काय चूक? त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघ गेल्या ५ वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर होता.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “तो एक उत्कृष्ट खेळाडू , उत्कृष्ट कर्णधार आहे आणि याची कोणीच खात्री देऊ शकत नाही की, भारतीय संघाने कर्णधार बदलला तर ते आयसीसीची ट्रॉफी जिंकतील. यात नशिबानेही साथ देणे गरजेचे असते. एखाद्यावर बोट उचलने सोपे असते. मुख्यतः ते ज्यांना क्रिकेट बद्दल फारसी माहीत ही नसते. ज्यांनी कधी गल्ली क्रिकेटमधील संघाचे नेतृत्व केले नाही, ते येऊन विराट कोहलीला नेतृत्वाचे धडे देत आहेत.”
महत्वाच्या बातम्या-
सहकाऱ्याकडून कोहलीची स्तुती; म्हणे, ‘इतर खेळाडू १०० टक्के देतात, पण तो २०० टक्केच्या प्रयत्नात असतो’
विश्वविजेता भारतीय शिलेदार उतरणार ‘या’ परदेशी लीगच्या मैदानात, केलं रजिस्ट्रेशन
‘टीम इंडिया, हार्दिकच्या भरोश्यावर राहण थांबवा; नवा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू शोधा’