---Advertisement---

पर्थ स्कॉर्चर्स बनले बिग बॅशचे ‘बॉस’; सिडनी सिक्सर्सला धूळ चारत पटकावले चौथे विजेतेपद

On: शुक्रवार, जानेवारी 28, 2022 6:03 PM
bbl winners
---Advertisement---

ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे व्यवसायिक टी२० लीग असलेल्या बिग बॅश लीगचा अंतिम सामना शुक्रवारी (२८ जानेवारी) खेळला गेला. बीबीएलमधील परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या पर्थ स्कॉर्चर्स व सिडनी सिक्सर्स या संघांमधील या सामन्यात पर्थने तब्बल ७९ धावांनी विजय मिळवून चौथे विजेतेपद आपल्या नावे केले.

मार्वल स्टेडियम येथे पार पडलेल्या या सामन्यात सिडनी सिक्सर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी अवघ्या २५ धावांमध्ये पर्थ स्कॉर्चर्सचे चार प्रमुख फलंदाज बाद केले. मात्र, त्यानंतर कर्णधार एश्टन टर्नर व लॉरी इवान्स यांनी १०४ धावांची भागीदारी रचली. दोघांनी अर्धशतके साजरी केली. टर्नर ५४ धावांवर बाद झाल्यानंतर इवान्सने नाबाद ७६ धावा करत संघाला निर्धारित २० षटकात १७१ धावांपर्यंत मजल मारून दिली.

पर्थने ठेवलेल्या १७२ धावांचा लक्षयापुढे सिडनी संघ पुरता ढेपाळला. त्यांनीही आपले आघाडीचे चार फलंदाज ६४ धावांमध्ये गमावले होते. मात्र, त्यानंतर अँड्रु टाय व झाय रिचर्डसन यांच्यापुढे उर्वरित फलंदाजांनी नांग्या टाकल्या. सिडनी संघ केवळ १६.२ षटकात ९२ धावा काढून बाद झाला. नाबाद ७६ धावांच्या खेळीसाठी लॉरी इवान्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पर्थ या विजयासह बीबीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनला आहे.

महत्वाच्या बातम्या-

आयपीएलसाठी नावनोंदणी केलेल्या भूतानच्या ‘त्या’ एकमेव खेळाडूचे भारताशी आहे घट्ट नाते; घ्या जाणून (mahasports.in)

पित्याच्या स्वप्नासाठी बनली क्रिकेटपटू, तेंडुलकरलाही टाकलंय मागं; वाचा भारताच्या ‘लेडी सेहवाग’चा क्रिकेटप्रवास (mahasports.in)

विंडीज दौऱ्यापूर्वी १ फेब्रुवारीला भारतीय संघ अहमदाबादमध्ये जमणार एकत्र, ‘असे’ असेल पुढील नियोजन (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---