---Advertisement---

हजरातुल्लाहच्या वादळी खेळीपुढे इस्लामाबाद युनायटेड हतबल; पेशावर जाल्मीचा पीएसएल २०२१च्या फायनलमध्ये प्रवेश

On: बुधवार, जून 23, 2021 6:01 PM
---Advertisement---

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या २४ जून रोजी खेळला जाणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इस्लामाबाद युनायटेड आणि पेशावर जाल्मी हे दोन्ही संघ आमने-सामने होते. या सामन्यात पेशावर जाल्मी संघातील फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

मंगळवारी (२२ जून ) पार पडलेल्या सामन्यात इस्लामाबाद युनायटेड आणि पेशावर जाल्मी या दोन्ही संघाने अटीतटीचा सामना पाहायला मिळाला होता. या सामन्यात पेशावर जाल्मी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

प्रथम फलंदाजी करताना इस्लामाबाद युनायटेड संघाकडून कॉलिन मुनरोने ४४ धावांचे योगदान दिले होते. यामध्ये त्याने ७ चौकार आणि १ षटकार लगावला होता.तसेच हसन अलीने शेवटी येऊन अवघ्या १६ चेंडूत ४५ धावा ठोकल्या होत्या. यामध्ये त्याने ५ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार लगावले होते. अर्धशतक पूर्ण करायला अवघ्या ५ धावा शिल्लक असताना तो धावचीत होत माघारी परतला होता. या तुफानी खेळीच्या जोरावर इस्लामाबाद संघाला ९ बाद १७४ धावा करण्यात यश आले होते.(Peshawar zalmi qualify for the Pakistan super league final)

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पेशावर जाल्मी संघाकडून हजरातुल्लाहने ४४ चेंडूत ६६ धावांची तुफानी खेळी केली. तसेच जोनाथन वेल्सने ४३ चेंडूंमध्ये ५५ धावांची खेळी केली. तसेच पेशावर जाल्मी संघाकडून शोएब मलिकने देखील आपल्या बॅटने अवघ्या १० चेंडूत ३२ धावा ठोकल्या.

त्यामुळे इस्लामाबाद युनायटेड संघाने दिलेले १७५ धावांचे आव्हान पेशावर जाल्मी संघाने अवघ्या १६.५ षटकात ८ गडी राखून पूर्ण केले. या विजयासह पेशावर जाल्मी संघाने २४ जून रोजी होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पेशावर जाल्मी आणि मुलतान सुलतान हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

ऐतिहासिक कसोटीच्या शेवटच्या दिवसासाठी काय असणार किवींची रणनीती? साउदीने केला खुलासा

चाहता म्हणाला, ‘प्लिज विलियम्सनला तंबूत पाठवा’; मग सोनू सूदने आपल्या उत्तरानेच केले बोल्ड

PSL 2021: पोलिसांकडून हैदराबादमधील सट्टेबाजांच्या टोळीचा भांडाफोड, ५ आरोपींना अटक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---