पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) (PSL) स्पर्धेच्या सातव्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना क्वेटा ग्लॅडीएटर्स (Quetta gladiators) आणि पेशावर जाल्मी (Peshawar jalmi) या दोन्ही संघांमध्ये पार पडला. ज्यामध्ये पेशावर जाल्मी संघाने अप्रतिम कामगिरी करत ५ गडी राखून विजय मिळवला. यासह स्पर्धेत जोरदार सुरुवात केली आहे. दरम्यान हा सामना सुरू असताना असा काही मजेशीर प्रकार घडला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कुठल्याही संघाचा कर्णधार गोलंदाजाला विचारून क्षेत्ररक्षण सजवण्याचे काम करत असतो. कारण गोलंदाज जो चेंडू टाकणार आहे, त्यानुसार तो क्षेत्ररक्षण सजवत असतो. परंतु हवं तस क्षेत्ररक्षण सजवू दे असं म्हणत गोलंदाजाने कर्णधाराला हात जोडल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? नाही? परंतु असा मजेशीर प्रकार घडलाय तो पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात.
हा सर्व प्रकार पेशावर जाल्मी संघाची फलंदाजी सुरू असताना घडला. या सामन्यात पेशावर जाल्मी संघाला विजय मिळवण्यासाठी २७ चेंडूंमध्ये ४३ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी नसीम शाह गोलंदाजी करण्यासाठी आला होता. यावेळी नसीम शाह हवं तसं क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी यष्टीमागे उभा असलेल्या कर्णधार सरफराज अहमदला हात जोडताना दिसून आला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात क्वेटा ग्लॅडीएटर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना क्वेटा ग्लॅडीएटर्स संघाला ४ बाद १९० धावा करण्यात यश आले होते. ज्यामध्ये विल स्मिडने सर्वाधिक ९७ धावांची खेळी केली. तर अहसान अलीने ७३ धावांची खेळी केली. पेशावर जाल्मी संघाकडून गोलंदाजी करताना समिन गुल आणि उस्मान कादिरने २-२ गडी बाद केले.
https://twitter.com/ginger__sports/status/1487307814833991681?s=20&t=GQnJfwmeGo02gFVA_zx7Sw
https://twitter.com/taimoorze/status/1487142639665401860?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1487142639665401860%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-2053673185272973590.ampproject.net%2F2201141909003%2Fframe.html
या धावांचा पाठलाग करताना पेशावर जाल्मी संघाने १९.४ षटकात ५ गडी गमावून हे आव्हान पूर्ण केले. या संघासाठी हुसेन तलतने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. तर शोएब मलिकने ४८ धावांची खेळी केली. तर क्वेटा ग्लॅडीएटर्स संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद नवाजने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तसेच जेम्स फॉल्कनरने आणि नसीम शाहने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
हे नक्की पाहा:
नेदरलॅंडच्या सर्वात यशस्वी फलंदाजाचा २९ व्या वर्षी क्रिकेटला रामराम; ट्विटरवरून केली घोषणा
हे नक्की पाहा :