भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आयपीएल स्पर्धा सुरू ठेवण्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात होती. या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने दिल्ली आणि अहमदाबादमध्ये खेळवले जात होते. बायो बबलमध्ये असून देखील कोलकाता नाईट रायडर्स संघातील २ खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. तसेच दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफमधील १० कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे उच्च न्यायालयात दिल्लीत होणारे सामने थांबवावेत याची मागणी केली होती. आता आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर देखील मुंबईच्या उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.
वकील वंदना शाह यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत १००० कोटींच्या भरपाईची मागणी केली आहे. या रकमेचा वापर कोविड-१९च्या रुग्णांसाठी करण्यात यावा. आयपीएल स्पर्धेची मोजणी आवश्यक सेवांमध्ये केली जावी. तसेच बोर्डाने आपल्या नफ्यातून रुग्णालयांना देणगी द्यावी. अशा कठीण काळात स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआय जबाबदार आहे, असे या याचिकेत म्हटले गेले आहे.
आयपीएल अत्यावश्यक सेवांमध्ये येते का?
वकील वंदना यांनी पुढे म्हटले की, “जरी खेळाडू आणि स्टाफ बायबबलमध्ये राहिले असतील. तरी देखील त्यांना कोरोना संसर्ग झाला. ही गोष्ट नाकारता येणार नाही. अशा परिस्थितीत सामाजिक भान न ठेवल्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. आयपीएल अत्यावश्यक सेवांमध्ये येते का? मला वाटते की, मंडळाने १००० कोटींची नुकसान भरपाई करावी. यासोबतच आपल्या नफ्यातून त्यांनी देणगी ही द्यावी.”
या खेळाडू आणि प्रशिक्षकांना आयपीएल स्पर्धा सुरू असताना झाली होती कोरोनाची लागण
१)वरूण चक्रवर्ती – कोलकाता नाईट रायडर्स
२)संदीप वॉरियर – कोलकाता नाईट रायडर्स
३)नितीश राणा – कोलकाता नाईट रायडर्स
४)देवदत्त पडीक्कल – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
५)अक्षर पटेल – दिल्ली कॅपिटल्स
६)एन्रीच नोर्किए- दिल्ली कॅपिटल्स
७)डॅनियल सॅम्स – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
८)अमित मिश्रा – दिल्ली कॅपिटल्स
९)वृद्धिमान सहा -सनराइजर्स हैदराबाद
१०)लक्ष्मीपती बालाजी (प्रशिक्षक ) – चेन्नई सुपर किंग्ज
११)किरण मोरे (प्रशिक्षक) – मुंबई इंडियन्स
आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर बीसीसीआय १००० कोटींची रक्कम कोविड-१९ रुग्णांच्या उपचारासाठी दान करते का नाही? हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सर रविंद्र जडेजा नको, मला फक्त..’, आपले कौतुक करणाऱ्या समालोचकाला जड्डूचे मन जिंकणारे उत्तर
‘खत्म, टाटा, बाय-बाय’; आयपीएल २०२१चा हंगाम स्थगित झाल्याने RRच्या खेळाडूची हटके प्रतिक्रिया
हीच का तुमची संवेदनशीलता? आयपीएल संघाच्या बससाठी पोलिसांनी ऍम्ब्युलन्सला थांबवले, व्हिडिओ व्हायरल






