इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात इंग्लिश संघाने 8 विकेट्सने कॅरेबियन संघाचा पराभव केला आहे. या सामन्यात फिल सॉल्ट इंग्लंडसाठी सर्वात मोठा हिरो ठरला. त्याने दमदार शतक झळकावत एकट्याने संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या या शानदार खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. वेस्ट इंडिजने इंग्लंडला विजयासाठी 183 धावांचे लक्ष्य दिले, जे इंग्लंडने सहज गाठले. सॉल्टशिवाय जेकब बेथेलने इंग्लंडकडून 58 धावांची खेळी खेळली.
फिल सॉल्टने डावाच्या सुरुवातीपासूनच स्फोटक फलंदाजी करत इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. त्याने 54 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांसह 103 धावा केल्या. त्याने आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. महत्त्वाची बाब म्हणजे ही तीनही शतके त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावली आहेत. टी20 मध्ये एकाच संघाविरुद्ध तीन शतके झळकावणारा फिल सॉल्ट हा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी कोणीही हे करू शकले नव्हते. फिल सॉल्टच्या आधी, सर्बियाचा लेस्ली डनबर, यूएईचा मोहम्मद वसीम, वेस्ट इंडिजचा एव्हिन लुईस आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल यांनी टी20 मध्ये एका संघाविरुद्ध प्रत्येकी दोन शतके झळकावली होती.
PHIL SALT SMASHED 103* RUNS FROM JUST 54 BALLS AS ENGLAND CHASE DOWN 183 RUNS IN JUST 16.5 OVERS 🤯
– Salt has increased his Price Tag more for Mega Auction with this knock…!!!! pic.twitter.com/DNpAdNVB2k
— Johns. (@CricCrazyJohns) November 10, 2024
टी20 मध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकणारे खेळाडू:
फिल सॉल्ट- वेस्ट इंडिजविरुद्ध 3 शतके
लेस्ली डनबार- बल्गेरियाविरुद्ध 2 शतके
एविन लुईस- भारताविरुद्ध 2 शतके
ग्लेन मॅक्सवेल- भारताविरुद्ध 2 शतके
महंमद वसीम- आयर्लंडविरुद्ध 2 शतके
वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावल्यानंतर फिल सॉल्टने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने या धावा 32 डावात पूर्ण केल्या आणि टी20 मध्ये 1000 धावा पूर्ण करणारा इंग्लंडचा दुसरा सर्वात वेगवान फलंदाज ठरला. त्याने केविन पीटरसनची बरोबरी केली आहे. पीटरसनने टी20 मध्ये 32 डावात 1000 धावा पूर्ण केल्या होत्या
फिल सॉल्टने 2022 साली इंग्लंडकडून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने 34 सामन्यांत 1047 धावा केल्या आहेत. ज्यात तीन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 27 एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 866 धावा केल्या आहेत.
हेही वाचा-
नीरज चोप्राचा मोठा निर्णय, तीन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियनला बनवले प्रशिक्षक
SL VS NZ; भारताला क्लीन स्वीप केलेल्या किवी संघाचे पराभव, श्रीलंका मालिकेत 1-0 ने पुढे
‘तुम्ही महान खेळाडूंकडे बोट दाखवू ….’, या दिग्गज ऑस्ट्रेलियनने केले विराट कोहलीचे समर्थन