RCB vs PBKS Final: यंदाच्या आयपीएल हंगामातील फायनल सामना आज (3 जून) खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) संघ आमने-सामने आहेत. दोन्ही संघ ट्राॅफीसाठी मैदानावर जीवाचं रान करताना दिसतील. एकीकडे पंजाब मास्टर प्लॅन बनवण्यात व्यस्त आहे, तर दुसरीकडे आरसीबी त्यांचा सुपर-इलेव्हन तयार करत आहे. फायनल सामन्यात आरसीबीकडून एक घातक सलामीवीर खेळेल हे निश्चित झाले आहे, जे पंजाबसाठी चांगली बातमी नाही. परदेशी फलंदाज त्याच्या मुलाच्या वाढदिवसामुळे घरी गेला होता, परंतु जेतेपदाच्या लढाईपूर्वी तो संघात परतला आहे.
आपण आरसीबीचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज फिल साल्टबद्दल (Phil Salt) बोलत आहोत, ज्याचे मायदेशी परतणे संशयास्पद होते. साल्ट (2 जून) रोजी सरावासाठी आरसीबी कॅम्पमध्ये नव्हता, परंतु तो फायनल सामन्यापूर्वी परतला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, फिल साल्ट फायनल सामन्यात प्लेइंग-इलेव्हनचा भाग असेल. दोन्ही संघ फायनल सामन्याच्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोणतेही मोठे बदल करू इच्छित नाहीत. (Phil Salt is back in the RCB team)
या हंगामात पंजाब किंग्ज संघाला आरसीबीकडून 3 सामन्यांमध्ये दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. दोन्ही संघांनी लीग टप्प्यात प्रत्येकी 1 सामना जिंकला होता, परंतु क्वालिफायर-1 मध्ये, आरसीबीने पुन्हा एकदा पंजाबला त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारत आयपीएल 2025च्या फायनलमध्ये धडक मारली. आता पंजाब किंग्ज त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज असेल. पण श्रेयस अय्यरच्या संघाला आरसीबीच्या फिल साल्ट आणि विराट कोहलीची सलामी जोडी तोडण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील.
परंतु, पंजाब आणि आरसीबी यांच्यातील फायनल सामन्यात पाऊस खलनायक बनू शकतो. क्वालिफायर-2 मध्येही पावसाने खेळ खराब केला होता. परंतु सामना 2 तास उशिरा सुरू झाला आणि पंजाबने रात्री उशिरा सामना जिंकला. अॅक्यूवेदरच्या रिपोर्टनुसार, फायनल सामन्यात 60 टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर आज फायनल सामना रद्द झाला तर 4 जून हा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. (Rain may disrupt RCB and Punjab match)






