---Advertisement---

PHOTO: केवळ क्रिकेटच नाहीतर ‘या’ खेळाचाही उस्ताद आहे संजू सॅमसन; पाहा व्हायरल फोटो

SANJU- SAMSON
---Advertisement---

आयपीएल २०२१ (IPL) मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करणारा संजू सॅमसन (Sanju Samson) नेहमीच चर्चेत असतो. मागच्या आयपीएल हंगामात त्याने अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधले होते. मैदानावरील चांगल्या प्रदर्शनाव्यतिरिक्त देखील संजू अनेक वेगवेगळ्या कारणांवरून चर्चेचा विषय ठरतो. आता पुन्हा एकदा संजू चाहत्यांमध्ये चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या चर्चेचे कारण आहे त्याचा एक फोटो, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यापूर्वी संजू सॅमसन अनेकदा त्याने केलेल्या डान्समुळे, तर कधी त्याच्या दानधर्मामुळे चर्चेत आला होता. पण यावेळी त्याचा हा फोटो चर्चेचे कारण ठरत आहे. फोटोत तो गोल्फ खेळताना दिसत आहे. संजूला क्रिकेट खेळण्यासाठी सर्वत्र ओळखले जात असले, तरी गोल्फचाही तो एक चांगला खेळाडू आहे. तो चांगल्या प्रकारे गोल्फ खेळू शकतो. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटून गोल्फ खेळताना पाहून चकित होत आहेत.

https://twitter.com/MaheshMGW23/status/1487500839396974592?t=bKqOXNrLZkR6H0H6dRmVUw&s=19

संजू सॅमसन या फोटोत एक मोठा शॉट मारताना दिसत आहे. यावेळी त्याने टी शर्ट आणि खाली शॉर्ट्स घातलेली आहे. सोबतच त्याच्या डोक्यावर कॅप देखील दिसत आहे. अशात तो एका प्रोफेशनल गोल्फरप्रमाणे दिसत आहे.

मागच्या हंगामात संजूने अप्रतिम प्रदर्शन केले होते. मात्र, तरीही भारतीय संघात त्याला पुनरागमनाची संधी मिळाली नाही. अशात आता पुढच्या आयपीएल हंगामात तो अधिक चांगले प्रदर्शन करून भारतासाठी खेळण्याची संधी मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. मागच्या वर्षी केलेल्या चांगल्या प्रदर्शनाचे आणि नेतृत्वाचे फळ म्हणून राजस्थान रॉयल्सने त्याला पुढच्या हंगामासाठी रिटेन केले आहे. राजस्थान संघाने पुढच्या हंगामासाठी रिटेन केलेल्या तीन खेळाडूंमध्ये संजू सॅमसन, जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांची नावे आहेत. राजस्थान संघाकडे अजून एका खेळाडूला रिटेन करण्याची संधी होती, पण संघाने या तिघांवर विश्वास दाखवला आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘सुपर सब’ नासिरीची हॅट्ट्रिक! ‘कोलकाता डर्बी’मध्ये मोहन बागानची सरशी

नेदरलॅंडच्या सर्वात यशस्वी फलंदाजाचा २९ व्या वर्षी क्रिकेटला रामराम; ट्विटरवरून केली घोषणा

“आमच्या कमाईचा हा एकमेव मार्ग”; रणजी ट्रॉफी विजेत्या कर्णधाराने सांगितले विदारक सत्य

व्हिडिओ पाहा –

https://youtu.be/VQbKF8BqeVo

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---