आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना या मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. परंतु, संजू सॅमसनला संधी न दिल्यामुळे चाहते भलतेच नाराज झाले आहेत. तसेच संजू सॅमसनने देखील सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) १५ सदस्यीय खेळाडूंची घोषणा केली. त्यावेळी संजू सॅमसनचे नाव त्या यादीत नव्हते. त्यानंतर संजू सॅमसनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर चाहते देखील आपल्या प्रतिक्रीया देताना दिसून येत आहे. सॅमसनने या फोटोवर कॅप्शन दिला नाहीये. सॅमसन यष्टिरक्षक फलंदाजासह एक अप्रतिम क्षेत्ररक्षक देखील आहे. या फोटोमध्ये तो सीमारेषेजवळ अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना दिसून येत आहे. कदाचित त्याला असे म्हणायचे आहे की,त्याला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून नव्हे तर एक फलंदाज म्हणुनही संघात स्थान देऊ शकतात.
संजू सॅमसनला २०१५ मध्ये भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर त्याने आतापर्यंत एकूण १० टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ११७ धावा करण्यात यश आले. परंतु, त्याला या संघात आपले स्थान टिकवून ठेवता आले नाहीये. याच वर्षी श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याने ४६ धावांची तुफानी खेळी केली होती. आयपीएल स्पर्धेत त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने १२१ सामन्यांमध्ये ३०६८ धावा केल्या ऊ.
तसेच १९३ टी२० सामन्यांमध्ये त्याने ४७२५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये २५ अर्धशतकांचा समावेश आहे. सॅमसनला घडविण्यात राहुल द्रविड यांचा मोलाचा वाट आहे. आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद राहुल द्रविड यांना मिळाल्यानंतर अशी आशा व्यक्त केली गेली होती की, सॅमसनला या संघात स्थान दिले जाऊ शकते. परंतु असे काहीच झाले नाही. या संघात व्यंकटेश अय्यर आणि ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
— Sanju Samson (@IamSanjuSamson) November 10, 2021
Giving Hint to Consider You As Pure Batsman rather than WK-Batsman !?
— ???? (@StanMSD) November 10, 2021
Yes to Warm the Bench. Let CSK give chances to TN players in the team
— Vishwa (@itis_vishwa) November 10, 2021
Bro bahat baar chance mila h.. bt fyda nehi utha Paya ..????♂️ shirf ipl m hi chalta h ye…
— Bคᖙคl????️ (@_HalcyonBadal) November 10, 2021
न्यूझीलंड संघाविरुद्धच्या टी -२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज






