इंडियन प्रीमियर लीगचा १५ वा हंगाम २६ मार्चपासून सुरू होत आहे. सर्व संघ सध्या आयपीएलची तयारी करत आहेत. आयपीएलच्या आगामी हंगामात ८ नाही तर १० संघ खेळताना दिसत आहेत. लीगचे सर्व सामने मुंबई आणि पुण्याच्या ४ मैदानात खेळवले जाणार आहेत. ५ वेळा आयपीएलचा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्स संघ सुद्धा मुंबईमध्ये आयपीएलची तयारी करत आहे. मुंबई फ्रॅंचायझीने खेळाडूंच्या सुरक्षितेच्या दृष्टीने जियो वर्ल्ड गार्डनमध्ये बायो सिक्योर एमआय अरेना तयार केला आहे, ज्यामध्ये खेळाडू आणि प्रशिक्षक तयारी करत आहेत. दरम्यान आयपीएलपूर्वी फ्रॅंचायझीने रोहित शर्माचे फोटोशूट केले आहे.
मुंबई फ्रॅंचायझीच्या ट्वीटर आकाऊंटवरुन एक फोटो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये संघाचा कर्णधार रोहित शर्मा संघाच्या जर्सीमध्ये दिसत आहे. तसेच रोहितच्या पाठीमागे मुंबईने जिंकलेल्या ५ आयपीएल ट्राॅफी ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबई संघाने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहले आहे की, ‘हिअर वी रो.‘ त्याचा हा फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोला अर्ध्या तासातच ३ हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच मुंबईने खेळाडूंचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये खेळाडू बायोबबलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत.
????????????????. ????????. ????????. ????#OneFamily #MumbaiIndians @ImRo45 pic.twitter.com/OMbp5rUAt3
— Mumbai Indians (@mipaltan) March 22, 2022
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीएल इतिहासात मुंबई संघाने २०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२० या ५ विजेतेपद जिंकले आहे. आयपीएल लिलावापूर्वी संघाने रोहित शर्मा, सुर्यकूमार यादव, जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्ड या खेळाडूंना रिटेन केले होते, आयपीएल लिलावात इशान किशनवर सर्वाधिक १५. २५ कोटी रुपये एवढी बोली लावत संघाने त्याला विकत घेतले आहे.
रोहित सध्या भारताच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील कर्णधार आहे. त्याने ४५ कसोटीत ३१३७ धावा केल्या आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये २३० सामन्यांत ९२८३ धावा केल्या आहेत आणि टी२० क्रिकेटमध्ये त्याने १२५ सामन्यांत ३३१३ धावा केल्या आहेत तर आयपीएलमध्ये त्याने २१३ सामन्यांत ५६११ धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्स संघ-
रोहित शर्मा( कर्णधार), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, बेसिल थंपी, मुरुगन अश्विन, जयदेव उनादकट, मयंक मार्कडेय, एन तिलक वर्मा, संजय यादव, जोफ्रा आर्चर, डेनियल सेम्स, टायमल मिल्स, टिम डेविड, राइली मेरेडिथ, मोहम्मद अरशद खान, अनमोलप्रीत सिंह, रमनदीप सिंह, राहुल बुद्धि, ऋतिक शॅाकीन, अर्जुन तेंदुलकर, फेबियन एलेन आणि आर्यन जुयाल.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाने जिंकली टॉपची लढत, अजेय दक्षिण आफ्रिकेला नमवत लगावला विजयाचा ‘सिक्सर’
Video: मुंबईचा कर्णधार रोहितला का आली सारा तेंडूलकरची आठवण? अर्जुनकडे बहिणीची केली चौकशी
अगग! शतक करूनही संघाला सामना न जिंकवून देऊ शकणारे क्रिकेटर, पंतचाही समावेश






