---Advertisement---

धोनी धोनी हैं! आमदार महेश लांडगेही आहेत कट्टर धोनी फॅन, कमबॅकवर म्हणाले…

On: शुक्रवार, सप्टेंबर 10, 2021 6:37 PM
---Advertisement---

येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा पार पडल्यानंतर युएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करत आहेत. दरम्यान बुधवारी (८ सप्टेंबर) बीसीसीआयने १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.

या संघात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. तसेच एमएस धोनीची संघ मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे, ज्यामुळे धोनीचे चाहते भलतेच खुश असून त्याला शुभेच्छा देताना दिसून येत आहे. दरम्यान पुण्यातील आमदारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करून धोनीचे अभिनंदन केले आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. भारतातच नव्हे तर जगभरात त्याचा चाहतावर्ग आहे. आता टी-२० विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाच्या मार्गदर्शकाची भूमिका पार पडणार आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा होणे साहजिक आहे. अगदी भाजपा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष व भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनीही पोस्टर छापून धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

आमदार महेश लांडगे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टरमध्ये विश्वचषकासाठी निवड झालेल्या भारतीय संघातील खेळाडूंचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. दरम्यान रांचीच्या धोनीला महेश लांडगे यांनी थेट पिंपरी-चिंचवडकर म्हणून संबोधित केले आहे. याला कारण म्हणजे धोनीचे पिंपरी चिंचवड महानगर पालिका परिसरात असलेले घर. रांचीकर धोनीचे पिंपरी-चिंचवडमधील घर पाहिले आहे का? वाचा त्याच्या पुण्यातील निवास स्थानाविषयी

महेश लांडगे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या पोस्टरचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्यांनी कॅप्शन म्हणून, “टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. पिंपरी-चिंचवडकर धोनी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सल्लागाराची भूमिका पार पाडणार,” असे लिहिले आहे. यावरुन ते धोनीचे किती कट्टर चाहते हे दिसून येतात. तसेच त्यांनी इतर खेळाडूंनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या पोस्टरवर त्यांनी सर्वच खेळाडूंची नावे लिहीली आहेत.  (Pimpri Chinchwad mla congratulates ms dhoni)

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ :  विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दिपक चाहर

महत्त्वाच्या बातम्या-

चार वर्षांनंतर अश्विनचे टी२०त पुनरागमन; निवडीमागे कर्णधार, प्रशिक्षक किंवा निवडकर्ते नव्हे ‘या’ शिलेदाराचा हात

धोनीपुढे मोठा पेच, टी२० विश्वचषकात भारताचा मार्गदर्शक बनण्यासाठी सोडावी लागणार सीएसकेची साथ!

फॉर्मात असूनही टी२० विश्वचषकासाठी लागली नाही पृथ्वी शॉची वर्णी, ‘या’ खेळाडूमुळे भंगले स्वप्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---