शनिवारी (१२ मार्च) भारत आणि श्रीलंका (Ind vs Sl ) संघामध्ये दिवस- रात्र कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघाचा हा चौथा कसोटी सामना असणार आहे. भारतीय संघाने फेब्रुवारी २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची दिवस-रात्र कसोटी खेळली होती. दिवस-रात्र कसोटीमध्ये (Day- Night Test) लाल चेंडूऐवजी गुलाबी चेंडू वापरला जातो, त्याला गुलाबी चेंडू कसोटी म्हणतात. हे असे करण्यामागचे कारण म्हणजे गुलाबी चेंडू प्रकाशात जास्त दिसून येतो.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २०१५ साली गुलाबी चेंडूचा पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना ३ विकेट्सने जिंकला आणि अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला होता. गुलाबी चेंडू कसोटी गोलंदाजांसाठी उपयोगी मानला जातो. कारण, चेंडू प्रकाशात अधिक स्विंग होतो.
गुलाबी चेंडू कसोटीत ५ विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड पहिला गोलंदाज ठरला होता. गुलाबी चेंडू कसोटीत ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने १० सामने खेळले असून प्रत्येक सामना जिंकला आहे. पिंक बॉल कसोटीत शतक झळकावणारा उस्मान ख्वाजा हा पहिला फलंदाज आहे
गुलाबी चेंडू कसोटीत ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक धावा केल्या आहेत. या संघाच्या नावावर ३ विकेट्सवर ५८९ धावा करण्याचा विक्रम आहे, जो ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध केला होता. डेविड वॉर्नरने (David Warner) या सामन्यात नाबाद ३३५ धावांची खेळी केली होती. ही खेळी गुलाबी चेंडू कसोटीत खेळाडूने खेळलेली सर्वोत्तम खेळी आहे. सर्वात कमी धावसंख्येमध्ये भारतीय संघाचे नाव आहे. ऍडलेड ओव्हलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने ९ बाद ३६ धावा केल्या आहेत. ही गुलाबी चेंडू कसोटीतील सर्वात कमी धावसंख्या आहे. गोलंदाजीत देवेंद्र विशू पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने पाकिस्तानविरुद्ध ४९ धावांत ९ बळी घेतले होते.
भारत आणि श्रीलंका संघांमध्ये दोन संघांमध्ये सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. भारतीय संघाने पहिली कसोटी मालिका जिंकली असून दुसरी मालिका १२ मार्चला बंगळुरूमध्ये खेळली जाणार आहे. या कसोटीत प्रेक्षकांनासुद्धा संधी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आता बंगळुरूचं मैदानही गाजवण्यासाठी ‘जड्डू’ सज्ज; मारणार एकाच दगडात दोन पक्षी!
वेस्ट इंडिजला विजयाच्या हॅट्रिकपासून रोखण्याची भारताकडे संधी, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही