---Advertisement---

मोठी बातमी! भारतात क्रिकेटचा पाया रचणारा दिग्गज हरपला, चाहते दु:खात

On: गुरूवार, नोव्हेंबर 10, 2022 5:05 PM
Death-Image
---Advertisement---

एकीकडे टी20 विश्वचषक 2022 सुरू असताना दुसरीकडे क्रीडाविश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. भारतात महिला क्रिकेटच्या विकासात 1970च्या दशकात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महेंद्र कुमार शर्मा यांचे मंगळवारी (दि. 08 नोव्हेंबर) पुण्यात निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. भारतीय महिला संघाची माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी यांनी महेंद्र शर्मा यांच्या निधनाची पुष्टी केली. शुभांगी या सुरुवातीच्या 5 वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या संस्थापक सचिव होत्या.

शुभांगी कुलकर्णी (Shubhangi Kulkarni) यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “महेंद्र कुमार शर्मा यांचे महिला क्रिकेटमध्ये खूप मोठे योगदान आहे. जेव्हा ते 20 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी WCAI मध्ये नोंदणी केली. काही वर्षांनी 1975 मध्ये देशात पहिला आंतरराष्ट्रीय सामना झाला. हा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला गेला होता.”

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाचा दौरा केला. महिला क्रिकेट अस्तित्वात आल्यानंतर सुरुवातीच्या पाच-सहा वर्षांमध्ये जे मिळवलं, ते अविश्वसनीय होते. संघाच्या संचालनासाठी कधीकधी त्यांनी आपल्या वडिलांकडून पैसे मागावे लागायचे आणि कधीकधी त्यांना उधारही घ्यावे लागायचे. 2006मध्ये महिला क्रिकेट बीसीसीआयच्या अंतर्गत आल्याचा सर्वाधिक आनंद सर्वात जास्त त्यालाच झाला होता.”

महिला क्रिकेटला अस्तित्वात आणण्याचे श्रेय महेंद्र शर्मा यांना जाते. कारण, त्यांनी 1973 मध्ये लखनऊ येथे WCAI ची सोसायटी कायद्यांतर्गत नोंदणी केली होती. बीसीसीआयने 2006मध्ये महिला क्रिकेटची जबाबदारी उचलली होती, पण महेंद्रच्या नेतृत्वात भारताने 1978मध्ये पहिल्यांदा महिला विश्वचषकाचे यजमानपद सांभाळले होते.

भारतीय संघाने 1997मध्ये दुसऱ्यांदा महिला विश्वचषकाचे यजमानपद स्वीकारले. या विश्वचषकाचा अंतिम सामना ईडन गार्डनमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला गेला होता. महेंद्र शर्मांच्या प्रयत्नांनी भारतीय महिला संघाने 1976मध्ये बंगळुरू येथे आपला पहिला कसोटी सामना जिंकला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
T20WC: फिफ्टी करताच हार्दिकने लावला विक्रमांचा तडाखा, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय
‘हिटमॅन’ने टी20 विश्वचषक 2022मध्ये केली खराब कामगिरी, एक अर्धशतक सोडले, तर सगळीकडे ठरलाय फ्लॉप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---