भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषकाच्या पाचव्या सामन्यात समोरासमोर आले आहेत. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी नाणेफेक झाली, जी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने जिंकली. तसेच, फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र सामना सुरू झाल्यानंतर काही वेळातच एक प्रसिद्ध व्यक्ती मैदानात घुसला.
King Kohli with Jarvo at Chepauk Stadium.
Jarvo is back….!!! pic.twitter.com/tqe93QIy16
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 8, 2023
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना सुरू झाल्यानंतर भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना, जार्वो 69 नावाची भारतीय संघाची जर्सी घालून, एक चाहता मैदानात घुसला. त्याला थेट विराट कोहली याने बाहेर जाण्याचा सल्ला दिला. हा जार्वो अशाप्रकारे मैदानात येण्याची ही पहिलीच वेळ नाही.
इंग्लंडचा रहिवासी असलेला जार्विस उर्फ जार्वो भारतीय संघाचा चाहता आहे. यापूर्वी 2021 भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेवेळी त्याने तब्बल तीन सामन्यांमध्ये मैदानात घुसण्याचा कारनामा केलेला. यामध्ये तो एकदा संपूर्ण किट घालून मैदानात उतरलेला. तसेच प्रत्येक वेळी त्याने भारतीय संघाची जर्सी घातलेली. त्यानंतर आता दोन वर्षांनी देखील त्यांनी तशीच करामत केली. या प्रकारानंतर तो पुन्हा एकदा सामना सुरू झाल्यानंतर मैदानात आलेला. त्यावेळी केएल राहुलने त्याला बाहेर जाण्याची विनंती केली.
या सामन्याचा विचार केल्यास दोन्ही संघ विश्वचषकातील आपला पहिला सामना खेळत आहेत. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम गोलंदाजीची संधी मिळाली. जसप्रीत बुमराह या नेहमीचे मार्शल खातेही न खोलू देता तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर अनुभवी डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. मात्र, कुलदीप यादवने वॉर्नर याला बाद करून भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले.
(Pitch Invander Jarvo Comes In World Cup Match India And Australia)
महत्वाच्या बातम्या –
आजपर्यंत जो विक्रम सचिन-डिविलियर्सच्या नावावर होता, तो वॉर्नरने टाकला मोडून; बनला यादीतील टॉपर
IND vs AUSच्या वर्ल्डकप अभियानाला सुरुवात! टॉस जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, पाहा तगडी प्लेइंग XI