भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी२० मालिका आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. मालिकेतील पाचवा सामना आता बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. रविवारी होणाऱ्या या सामन्यात कोणता संघ मालिका जिंकणार हे कळेल. आतापर्यंत दोन्ही संघांनी २-२ सामने जिंकले आहेत. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने सलग विजयांची नोंद केली आहे. अशा स्थितीत भारतीय संघाचा उत्साह उंचावला आहे, असे म्हणता येईल.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत आघाडी घेतली असली तरी शेवटचे दोन सामने गमावले. हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक यांनी टीम इंडियासाठी उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. दुसरीकडे, हर्षल पटेल, आवेश खान आणि युझवेंद्र चहल यांनी चमकदार कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी वरच्या फळीतील फलंदाजांनी धावा न करणे ही चिंतेची बाब आहे. गोलंदाजीमध्ये त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत पण फलंदाजीत संघाला मागील दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीच्या सामन्याची अपेक्षा आहे.
दोन्ही संघात मालिकेचा निर्णायक पाचवा सामना रविवारी (१९जून) बंगळूरूच्या चिन्नस्वामी स्टेडियम येथे खेळला जाईल. या सामन्यात दोन्ही संघ मालिका आपल्या नावावर करण्यासाठी झगडताना दिसतील. त्यामुळे क्रिकेटचाहत्यांसाठी मात्र हा सामना म्हणजे तुफान मेजवानी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग ११
ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (कर्णधार), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान
दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग ११
टेम्बा बावुमा (क), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रायसे व्हॅन डेर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, मार्को यान्सेन, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी, एनरिक नॉर्टजे
खेळपट्टी आणि हवामान माहिती
बंगळुरूची खेळपट्टी आणि छोटे मैदान फलंदाजांसाठी उपयुक्त ठरले आहे. फिरकीपटूंना थोडी मदत केली तरी चालेल. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. प्रथम फलंदाजी करणार्या संघाला १८० पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पंतने खेळलेल्या ‘त्या’ चालीचे नेहराजींनी केले कौतुक, म्हणाले ‘या गोष्टी महत्त्वाच्या असतात’
VIDEO । चेन्नईच्या चाहत्यांचा नाद नाय राव!, भारताच्या सामन्यांतही घुमला सीएसकेचा जयघोष






