सध्या भारतातील विविध शहरांमध्ये देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी खेळली जात आहे. सोमवारी (27 नोव्हेंबर) स्पर्धेतील तिसऱ्या फेरीचे सामने खेळले गेले. यामध्ये गुजरात विरुद्ध अरुणाचल प्रदेश अशा झालेल्या सामन्यात मजबूत गुजरात संघाने आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयात महत्त्वाचे योगदान देणारा गुजरातचा फिरकीपटू पियुष चावला याने एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवली.
मागील हंगामापासून उत्तर प्रदेश सोडून गुजरातसाठी खेळत असलेल्या चावला याने या सामन्यात तीन बळी मिळवले. त्याने दहा षटकात केवळ 30 धावा देताना तीन बळी मिळवले. त्यामुळे गुजरातने अरुणाचल प्रदेशचा डाव केवळ 159 धावांवर रोखला. त्यानंतर गुजरातच्या फलंदाजांनी केवळ दोन गडी गमावत हे लक्ष पार केले.
Big Congratulations from GCA to #piyushchawla for Achieving milestone of 1000 wickets across all the format of cricket.#teamgujarat #BCCI #BCCIDomestic #Cricket@BCCI @BCCIdomestic @DhanrajNathwani @mpparimal @JayShah @parthiv9 @akshar2026 @Jaspritbumrah93 @GujaratRanji pic.twitter.com/SbdxoWbGpD
— Gujarat Cricket Association (Official) (@GCAMotera) November 27, 2023
या सामन्यात आपला दुसरा बळी घेताच चावला याने आपल्या कारकिर्दीत 1000 बळींचा टप्पा पार केला. त्याच्या नावे आता आपल्या कारकिर्दीत 1001 बळी जमा आहेत. त्याने आतापर्यंत 136 प्रथम श्रेणी सामने खेळताना 445 बळी मिळवले आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 163 सामने खेळताना त्याने 254 बळी आपल्या नावे केलेत. तर त्याने खेळलेल्या आत्तापर्यंतच्या टी20 क्रिकेटमध्ये 284 सामने खेळताना 302 बळी टिपले आहेत.
चावला याने भारतीय संघासाठी केवळ सतराव्या वर्षी कसोटी पदार्पण केले होते. त्याने भारतीय संघासाठी 3 कसोटी सामन्यात 7 बळी, 25 वनडे सामन्यात 32 बळी व 7 टी20 सामन्यात 4 बळी मिळवले आहेत. भारताने जिंकलेल्या 2011 वनडे विश्वचषकात तो संघाचा सदस्य होता. सध्या केवळ 34 वर्षाच्या असलेल्या चावला याने भारतासाठी अखेरचा सामना 11 वर्षांपूर्वी 2012 मध्ये खेळला आहे.
(Piyush Chawla Completed His 1000 Wickets In Cricket Career)
महत्वाच्या बातम्या –
बीड क्रिकेटची शान वाढवणारा सचिन! युएईमध्ये खेळणार टीम इंडियासाठी U19 आशिया कप
अखेर हेजलवूडला संघातून वगळण्याचं कारण समजलं! आरसीबीच्या धाडसी निर्णयामागे आहे ‘हे’ कारण