सध्या भारतीय संघाकडे असे अनेक खेळाडू आहेत. जे सक्षम असूनही संघाचा भाग होण्यास मुकले आहेत. संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड हे असे दोन खेळाडू आहेत. ज्यांना सातत्यपूर्ण संधी मिळत नाही. अनेक वेळा चाहत्यांना असे वाटते की बीसीसीआय या दोन खेळाडूंवर अन्याय करत आहे. आता या दरम्यान जेव्हा पियूष चावलाला एका पॉडकास्टमध्ये संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात कोण जास्त अनलकी आहे असे विचारण्यात आले तेव्हा त्याने महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली.
शुभंकर मिश्रा यांनी पियुषला सांगितले की, ऋतुराजला कमी संधी दिली जात असल्याचे अनेकांना वाटते. चांगली कामगिरी करूनही त्याला वगळण्यात आले. यावर उत्तर देताना चावला म्हणाला, ‘हे बघा हे सर्व सुरूच राहणार आहे. पण तुम्ही बघा जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तो येतो आणि इतरांपेक्षा वेगळी कामगिरी करतो. नंतर मग होस्टने विचारले की संजू सॅमसन आणि गायकवाड यांच्यात तुम्हाला कोण जास्त दुर्दैवी वाटतो? यावर चावला म्हणाला, ‘दोघेही मित्र आहेत, हा जरा अवघड प्रश्न आहे. मी त्यांना दुर्दैवी म्हणणार नाही कारण संघात एक संयोजन (काॅम्बीनेशन) आहे. त्यामुळे त्यात हे घडते.
त्यानंतर संजू सॅमसन दुलीप ट्रॉफीमध्ये न खेळण्याच्या कारणाबद्दलही शुभंकर मिश्रांनी आश्चर्य व्यक्त केले. माझ्यासाठीही हे थोडेसे अस्ताव्यस्त असल्याचे चावलाने सांगितले. सॅमसन खूप चांगला खेळाडू आहे. तो निवडकर्त्यांच्या लाल चेंडू क्रिकेट योजनेत का नाही हे मी सांगू शकत नाही. सॅमसनच्या रेकॉर्डबद्दल बोलताना यजमानाने चावलाला कमी संधी मिळण्याचे कारणही विचारले. यावर तो म्हणाला की, निवडकर्ता झाल्यावर तुम्हाला उत्तर देतो.
सॅमसन शेवटचा श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसला होता. ज्यामध्ये त्याची कामगिरी खूपच लाजिरवाणी होती. सलग दोन सामन्यांत तो शून्यावर बाद झाला. सॅमसनला दुलीप ट्रॉफी 2024 साठी दुसऱ्या फेरीत भारत ड संघात स्थान मिळाले आहे.
हेही वाचा-
बांग्लादेश कसोटी सामन्यापूर्वी ‘रोहित-विराट’ चेन्नईला पोहोचले; पाहा VIDEO
91 वर्षात पहिल्यांदाच, अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटी सामना एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द!
हार्दिक पांड्याचे कसोटीत पुनरागमन? ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी दिला मोठा इशारा