चेन्नई। प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. या मोसमात आज तमिळ थलायवाज विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात दुसरा सामना रंगणार आहे.
तमिळ थलायवाजचा हा या मोसमातील दुसरा सामना आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात गतविजेत्या पटना पायरेट्सला 42-26 अशा फरकाने पराभूत करत मोसमाची विजयी सुरुवात केली आहे.
तमिळ संघाचा कर्णधार अजय ठाकूरने पहिल्याच सामन्यात पटना विरुद्ध सुपर टेन मिळवले आहे. त्याचबरोबर या सामन्यात अजयला सुरजीत सिंग आणि जसवीर सिंग यांचीही चांगली साथ मिळली होती. त्यामुळे यूपी विरुद्धच्या सामन्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहेत.
तमिळच्या बचाव फळीची जबाबदारी मनजीत चिल्लर आणि अमित हुडा यांच्यावर असेल. तसेच दर्शन जेकडूनही अनेक अपेक्षा आहेत. त्याला पटना विरुद्ध खास काही करता आले नव्हते.
यूपी योद्धा संघाचे नेतृत्व यावेळेस रिशांक देवाडीगा करणार आहे. त्याला महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे या अनुभवाचा त्याला फायदा होईल.
त्याचबरोबर त्याला चढाईत श्रीकांत जाधव आणि प्रशांत कुमारची साथ मिळेल, असे अपेक्षित आहे. तसेच बचाव फळीत अनुभवी जीवा कुमार बरोबर सागर क्रिष्णा, नितीन मावी आणि नितेश कुमार यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बचाव फळीत चांगले मिश्रण आहे.
या खेळाडूंकडे असेल लक्ष-
यूपी योद्धाचा कर्णधार रिशांकसाठी हा सामना नक्कीच सोपा असणार नाही. त्याला मनजीत चिल्लरचा सामना करावा लागणार आहे. मनजीतसाठी या प्रो कबड्डी मोसमाची सुरुवात चांगली झाली आहे.
त्याने पटना विरुद्ध 5 टॅकल पॉइंट्स मिळवले आहेत. तसेच त्याला प्रो कबड्डीच्या इतिहासात पहिल्यांदाच 250 टॅकल पॉइंट्स मिळवण्याची संधी आहे.
तमिळकडून सुरजीत सिंगने कर्णधार अजय ठाकूरला चांगली साथ देताना 7 रेड पॉइंट्स मिळवले आहे. त्यामुळे या सामन्यातही त्याच्यावर लक्ष असणार आहे.
तसेच यूपी योद्धाच्या श्रीकांत जाधवसाठी पाचवा मोसम चांगला ठरला होता. पण आता तमिळ विरुद्ध त्याला मनजीत चिल्लर आणि अमित हुडा या दोन कॉर्नर सांभाळणाऱ्या बचावपटूंचा सामना करत रेड पॉइंट्स मिळवावे लागणार आहेत.
आमने सामने-
तमिळ थलायवाज विरुद्ध यूपी योद्धा हे दोन संघ आत्तापर्यंत 4 वेळा आमने सामने आले आहेत. या चार सामन्यांपैकी तमिळने 2 सामन्यात विजय मिळवला आहे तर यूपीने एका सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच एक सामना बरोबरीत संपला आहे.
प्रो कबड्डी- तमिळ थलायवाज विरुद्ध यूपी योद्धा सामन्याबद्दल सर्वकाही…
तमिळ थलायवाज विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात कधी होणार सामना?
तमिळ थलायवाज विरुद्ध यूपी योद्धा यांच्यातील सामना 8 आॅक्टोबर 2018 ला होणार आहे.
कोठे होईल तमिळ थलायवाज विरुद्ध यूपी योद्धा यांच्यातील सामना?
तमिळ थलायवाज विरुद्ध यूपी योद्धा यांच्यातील सामना जवाहरलाल नेहरु स्टेडीयम, चेन्नई येथे होणार आहे.
किती वाजता सुरु होईल तमिळ थलायवाज विरुद्ध यूपी योद्धा यांच्यातील सामना?
भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9.00 वाजता तमिळ थलायवाज विरुद्ध यूपी योद्धा यांच्यातील सामन्याला सुरुवात होईल.
तमिळ थलायवाज विरुद्ध यूपी योद्धा यांच्यातील सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना तमिळ थलायवाज विरुद्ध यूपी योद्धा यांच्यातील सामना पाहता येणार आहे.
तमिळ थलायवाज विरुद्ध यूपी योद्धा यांच्यातील सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?
hotstar.com या वेबसाईटवर तमिळ थलायवाज विरुद्ध यूपी योद्धा यांच्यातील सामना ऑनलाइन पाहता येईल.
यातून निवडला जाईल 7 जणांचा संघ-
तमिळ थलायवाज- अजय ठाकूर, सुकेश हेगडे, सुरजीत सिंग, दर्शन जे, मनजीत चिल्लर, जसविर सिंग, के जयासिलन, अतुल एमएस, सुनील, चॅन सिक पार्क, अनिल शर्मा, अभिनंदन चांडेल, डी गोपू, विमल राज, जेई मीन ली, अमित हुडा, सी अरुण, डी प्रदाप, रजनीश, अनिल कुमार, आनंद.
यूपी योद्धा- रिशांक देवाडिगा, प्रशांत कुमार राय, जीवा कुमार, श्रीकांत जाधव, सचिन कुमार, सिओंग रिओल किम, सुलेमान कबीर, नरेंदर, रोहित कुमार चौधरी, अमित, भानू तोमर, पंकज, नितेश कुमार, आझाद सिंग, नितीन मावी, विशव चौधरी, अक्रम शेख, सागर क्रिष्णा
महत्त्वाच्या बातम्या-
–प्रो कबड्डी- आज मनजीत चिल्लरला कबड्डीमधील सर्वात मोठा पराक्रम करण्याची संधी
–प्रो कबड्डी: गिरीष एर्नाक की सुरेंदर नाडा? आज पुणे विरुद्ध हरियाणात कबड्डीचा थरार
–टॉप 5: प्रो कबड्डीच्या पहिल्याच दिवशी झाले हे खास विक्रम